IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि विकेटने सुरूवात केली. मयंक यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कमबॅक केलं.

IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक
IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jul 23, 2026 | 5:09 PM

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि जवळपास पावणे दोन वर्षांनी कमबॅक करणाऱ्या मयंक यादवच्या हाती चेंडू सोपवला. मयंक यादवने शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध 2024 मध्ये खेळला होता. त्यानंतर 21 महिन्यांनी त्याने कमबॅक केलं आहे. त्याचं कमबॅक विकेटने झालं. पहिल्याच चेंडूवर त्याने झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटची विकेट काढली आणि भारताला पहिलं यश मिळवून दिलं. मयंक दुखापतीनंतर कमबॅक करत असल्याने त्याच्या गोलंदाजीच्या वेगाकडे लक्ष लागून होतं. पण त्याने पहिलाच चेंडू 149 किमी प्रति तास वेगाने टाकला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या वेगवान चेंडूचा सामना करताना ब्रायन बेनेट चाचपडला आणि बॅटला हलकी किनार लागून थेट चेंडू विकेटकीपर इशान किशनच्या हाती गेला.

मयंक यादवचा स्पीड आणि विकेट

मयंक यादवची आंतरराष्ट्रीय भूमीवर पहिलीच विकेट आहे. यापूर्वी बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका भारतात झाली होती. 2024 मध्ये पार पडलेल्या सामन्यात मयंकने चार विकेट काढल्या होत्या. त्यानंतर आता झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या भूमीवर विकेट काढली आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय विकेटचा झेंडा रोवला आहे. मयंकने 149 किमी प्रतितास वेगाने चेंडू ऑफ स्टंपच्या किंचित बाहेर टाकला. त्यामुळे झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रायन बेनेट फसला. त्याच्या बॅटजवळून चेंडू वेगाने निघून गेला. त्याला बॅटला घासून गेला हे देखील कळलं नाही. त्यामुळे रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांनी तपासल्यानंतर बॅटला बॉल घासून गेल्याचं स्पष्ट दिसलं. त्यामुळे झिम्बाब्वेचा रिव्ह्यू वाया गेला आणि मयंकच्या खात्यात विकेट गेली. मयंक यादवने त्याच्या वैयक्तिक तिसऱ्या षटकात आणखी एक विकेट काढली. डिओन मायर्स याला तंबूचा रस्ता दाखवला.

मयंक यादवने दुसऱ्यांदा केली अशी कामगिरी

मयंक यादवने दुसऱ्यांदा पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. यापूर्वी 2024 मध्ये बांगलादेशच्या परवेझ हुसेन इमोनला पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला होता.भारताकडून भुवनेश्वर कुमारने तीनदा पहिल्याच चेंडूवर विकेट काढली आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, मयंक यादव यांनी दोनदा हा कारनामा केला आहे. तर फिरकीपटू आर अश्विनने एकदा पहिल्याच चेंडूवर विकेट काढली आहे.

Follow Us