Women MPL : आयपीएलनंतर आता पोरी गाजवणार MPL, स्मृती मंधाना कप्तान, ऋतुराजची पत्नी उत्कर्षाही दिसणार मैदानात

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित केलेल्या लीगमधून नवा दमाच्या खेळाडूंना संधी मिळणार आहे. मात्र अशातच साखळी फेरी झाल्यानंतर महाराष्ट्रातील महिला क्रिकेटपटूंचेही सामने पार पडणार आहेत.

Women MPL : आयपीएलनंतर आता पोरी गाजवणार MPL, स्मृती मंधाना कप्तान, ऋतुराजची पत्नी उत्कर्षाही दिसणार मैदानात
| Updated on: Jun 22, 2023 | 6:28 PM

मुंबई : MPL स्पर्धेचा थरार पाहायला मिळत असून रोमांचक सामने होत आहेत. आता एमपीएल स्पर्धा शेवटाकडे आली असून 29 जूनला फायनल सामना पाार पडणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित केलेल्या लीगमधून नवा दमाच्या खेळाडूंना संधी मिळणार आहे. अशातच साखळी फेरी झाल्यानंतर महाराष्ट्रातील महिला क्रिकेटपटूंचेही सामने पार पडणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र प्रीामिअर लीगच्या ट्विटर हँडलरवर माहिती देण्यात आली आहे.

सामने कधी आणि कुठे होणार?

महिलांच्या सामन्यांसाठी तीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. यामधील एका संघाच्या कर्णधारपदाची धुरा महिला टीम इंडियाची उपकर्णधार स्टार खेळाडू स्मृती मंधानाकडे देण्यात आली आहे. हे सामने तीन दिवस होणार असून पुरूष संघांमधील चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरणार आहेत. साखळी फेरी झाल्यानंतर तीन दिवसांचा मध्ये गॅप असणार आहे. या कालवधीत महिलांचे सामने खेळवण्यात येणार आहेत. महिलांचे सामने गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर होणार आहेत. येत्या 25 जून, 27 जून आणि 28 जूनला पार पडणार आहेत.

 

तिन्ही संघाची नावं ही, एमसीए ब्लू, एमसीए रेड आणि एमसीए येलो अशी नावं देण्यात आली आहेत. यामधील एमसीए ब्लू संघाची कर्णधार स्मृती मंधाना, एमसीए रेडची कर्णधार देविका वैद्य आणि एमसीए यलो संघाची कर्णधार तेजल हसबनीस करणार आहे.

दरम्यान,  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी पुढील वर्षी महिला एमपीएलचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. पहिल्या सीझनमध्ये चार संघ सहभागी होणार आहे. यंदा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला टीम इंडियाच्या माजी महिला खेळाडूंचा सत्कार करण्यात आला होता.