MI vs DC IPL 2022: मुंबईच्या टीममध्ये दोन बदल पण Arjun Tendulkar ला संधी नाहीच

| Updated on: May 21, 2022 | 7:27 PM

MI vs DC IPL 2022: मुंबई जिंकली, तर दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. दिल्लीने सामना जिंकला, तर त्यांचे 16 पॉइंट्स होतील. नेट रनरेट त्यांचा आरसीबीपेक्षा चांगला आहे.

MI vs DC IPL 2022: मुंबईच्या टीममध्ये दोन बदल पण Arjun Tendulkar ला संधी नाहीच
Mumbai Indians Arjun Tendulkar
Image Credit source: ipl/bcci
Follow us on

मुंबई: वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये (MI vs DI) सामना होत आहे. आयपीएलमधला हा 69 वा सामना आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला असून चालू असलेल्या ट्रेंडनुसार त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि दिल्ली दोन्ही संघाचा लीगमधला हा शेवटचा सामना आहे. प्लेऑफ फेरीतील तीन संघ निश्चित झाले आहेत. चौथा टीम कुठली? ते आज ठरेल. दिल्ली जिंकली, तर प्लेऑफमध्ये (Playoff) आणि हरली तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्लेऑफमध्ये दाखल होईल. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं प्लेऑफमध्ये पोहोचणं, सर्वस्वी Mumbai Indians वर अवलंबून आहे. दिल्लीसाठी हा सामना ‘करो या मरोच’ असेल. RCB च्या फॅन्सनी मुंबईच्या विजयासाठी आतापासूनच प्रार्थना सुरु केली आहे.

मुंबईच्या संघात संधी मिळालेले ते दोन जण कोण?

मुंबई जिंकली, तर दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. दिल्लीने सामना जिंकला, तर त्यांचे 16 पॉइंट्स होतील. नेट रनरेट त्यांचा आरसीबीपेक्षा चांगला आहे. त्यामुळे सहाजिकच प्लेऑफसाठी ते पात्र ठरतील. रोहित शर्माने आजच्या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. डेवाल्ड ब्रेव्हिस आणि ऋतिक शौकीनचा संघात समावेश केला आहे. पण तमाम क्रिकेट चाहत्यांना ज्याची अपेक्षा होती, त्या अर्जुन तेंडुलकरला संधी दिलेली नाही. भविष्यावर आमची नजर आहे. पण सामना जिंकण आणि मोसमाचा शेवट गोड करण्याला आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं रोहितने सांगितलं. वानखेडे स्टेडियमवर सध्या पावसाच्या हलक्या सरी कोसळल आहेत. “मी टॉस जिंकलो असतो, तर गोलंदाजीच घेतली असती” असं दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत म्हणाला.

पृथ्वी शॉ चं कमबॅक

दिल्लीच्या संघातही आज एक बदल करण्यात आला आहे. टायफाइड मधून बरा झालेल्या पृथ्वी शॉ चा संघात समावेश करण्यात आला आहे. पृथ्वी शॉ परतल्याने ऑलराऊंडर ललित यादवला संधी मिळू शकलेला नाही. दिल्ली आजचा सामना जिंकण्यासाठी जिवाचं रान करेल, अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्स प्रतिष्ठा राखण्यासाठी विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. या सीजनमध्ये मुंबईच्या पराभवाची सुरुवात दिल्लीपासूनच झाली होती.

Mumbai Indians प्लेइंग -11

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, रमणदीप सिंह, टिम डेविड, डॅनियल सॅम्स, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे, रिले मेरेडिथ,

Delhi Capitals प्लेइंग – 11

ऋषभ पंत (कॅप्टन), डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, सर्फराझ खान, रोव्हमॅन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्खिया, खलील अहमद,