MI vs DC Prediction Playing XI IPL 2022: उद्या RCB चं सगळं लक्ष मुंबई इंडियन्सवर, कशी असेल MI ची Palying- 11

| Updated on: May 20, 2022 | 5:01 PM

मागचे दोन सामने जिंकून दिल्लीची टीम स्वत:ला प्लेऑफच्या शर्यतीत टिकवून आहे. त्यांनी आधी राजस्थान रॉयल्सला हरवलं. त्यानंतर पंजाब किंग्सला नमवलं. मुंबई विरुद्ध विजयी अभियान कायम ठेवण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल.

MI vs DC Prediction Playing XI IPL 2022: उद्या RCB चं सगळं लक्ष मुंबई इंडियन्सवर, कशी असेल MI ची Palying- 11
MI vs DC
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगचा (IPL) हा 15 वा सीजन आहे. उद्या मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. दोन्ही टीम्सचा लीगमधला हा शेवटचा सामना आहे. मुंबईची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर गेली आहे. दिल्लीचा संघ अजून प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिमयवर मॅच होणार आहे. दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर काहीही करुन Mumbai Indians ला हरवावचं लागेल. दिल्लीचे 13 सामन्यात सात विजयांसह 14 पॉइंट्स आहेत. उद्या ते जिंकले, तर त्यांचे 16 पॉइंट्स होतील. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचेही (RCB) 16 पॉइंट्स आहेत. बँगलोरच्या तुलनेत दिल्लीचा नेट रनरेट चांगला आहे. दिल्ली उद्या जिंकली, तर RCB चं आव्हान संपुष्टात येईल.

मागचे दोन सामने जिंकून दिल्लीची टीम स्वत:ला प्लेऑफच्या शर्यतीत टिकवून आहे. त्यांनी आधी राजस्थान रॉयल्सला हरवलं. त्यानंतर पंजाब किंग्सला नमवलं. मुंबई विरुद्ध विजयी अभियान कायम ठेवण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल. मुंबईची टीम गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. मोसमाचे शेवट विजयाने करण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न असेल.

अर्जुन तेंडुलकरला मिळू शकते संधी

मुंबईने मागच्या काही सामन्यात नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा काही बदल करु शकतो. कायरन पोलार्डला बाहेर बसवून मुंबईने युवा खेळाडूंना संधी दिली. रोहित अखेरच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संधी देऊ शकतो. अर्जुनला इन करताना, बाहेर कोणाला बसवायचं? यावर रोहितला थोडा विचार करावा लागेल.

सर्फराज खानला उद्या संधी मिळेल?

दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत टीममध्ये फार बदल करायच्या फंदात पडणार नाही. पृथ्वी शॉ़ ठीक झाला, तर सर्फराज खानला बाहेर बसवलं जाईल. शॉ ला टायफाइड झाला होता. पृथ्वीला मागच्याच आठवड्यात रुग्णालायतून डिस्चार्ज मिळाला. मागच्या सामन्यात सर्फराजने डेविड वॉर्नरसोबत मिळून धडाकेबाज सुरुवात केली होती. एनरिक नॉर्खिया प्रभावित करु शकलेला नाही. त्यामुळे त्याच्याजागी मुस्ताफिजुर रहमानला संधी मिळू शकते.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग – 11

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, ट्रिस्टन स्टब्स, डॅनियल सॅम्स, संजय यादव, रमनदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे, अर्जुन तेंडुलकर

दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत (कॅप्टन), डेविड वॉर्नर, सर्फराज खान, मिचेल मार्श, ललित यादव, रोव्हमॅन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, मुस्ताफिजुर रहमान