WPL 2023 Final | दिल्ली कॅपिट्ल्सचं शानदार कमबॅक, मुंबई इंडियन्सला विजयासाठी 132 रन्सचं टार्गेट

| Updated on: Mar 26, 2023 | 9:42 PM

MI vs DC WPL Final 2023 | वूमन्स प्रीमिअर लीगमधील अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी धावांचं आव्हान दिलं आहे.

WPL 2023 Final | दिल्ली कॅपिट्ल्सचं शानदार कमबॅक, मुंबई इंडियन्सला विजयासाठी 132 रन्सचं टार्गेट
Follow us on

मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग 2023 फायनलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात करत दिल्लीला सुरुवातीपासून धक्के द्यायला सुरुवात केली. दिल्लीचे फलंदाज हे फक्त काही धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरत होते. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली. त्यामुळे दिल्लीची 79-9 अशी स्थिती झाली होती. यामुळे दिल्ली अडचणीत सापडली. मात्र शिखा पांडे आणि राधा यादव या दोघींनी दिल्लीची लाज राखली. या दोघींनी केलेल्या खेळीमुळे दिल्लीला सन्मानजनक आव्हान देता आलं.

10 व्या विकेट्साठी अर्धशतकी भागीदारी

राधा यादव आणि शिखा पांडे या जोडीने 10 विकेट्ससाठी 52 धावांची निर्णायक आणि नाबाद भागीदारी केली. यादरम्यान शिखा पांडे आणि राधा यादव या दोघींनी प्रत्येकी 27 धावांची नाबाद खेळी केली. या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 131 धावा केल्या. दिल्लीला या भागीदारीमुळे मुंबईला 132 धावांचं सन्मानजनक आव्हान देता आलं.

राधा  आणि शिखा या दोघींव्यतिरिक्त दिल्लीकून कर्णधार मेग लॅनिंग हीने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर मुंबईकडून इस्सा वाँग आणि हॅली मॅथ्यूज या दोघींनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर मेली केर हीने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

मुंबईला विजयासाठी 132 धावांचं आव्हान


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन| हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, राधा यादव आणि शिखा पांडे.