Mohammed Shami : विराट कोहलीसाठी मोहम्मद शमी उभा राहिला, सरळ बोलला की….

Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या इंटरव्यूमुळे चर्चेत आहे. तो अनेक मुद्यांवर मोकळेपणाने बोलला आहे. मोहम्मद शमी शुभंकर मिश्राच्या यू-ट्यूब शो मध्ये आला होता. याच शो मध्ये अमित मिश्राने काही वक्तव्य केलेली. विराट कोहलीसोबत कसं बॉन्डिंग आहे? टीम इंडियात कोण बेस्ट फ्रेंड आहे? या बद्दलही मोहम्मद शमी व्यक्त झाला.

Mohammed Shami : विराट कोहलीसाठी मोहम्मद शमी उभा राहिला, सरळ बोलला की....
mohammed shami-virat kohli
Image Credit source: Visionhaus/Getty Images
| Updated on: Jul 20, 2024 | 12:42 PM

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमधून पूर्णपणे सावरलाय. वर्ल्ड कप 2023 पासून तो टीमच्या बाहेर आहे. शमीवर शस्त्रक्रिया झाली. नेट्समध्ये त्याने गोलंदाजी सुरु केलीय. पुढच्या काही महिन्यात तो टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो. सध्या आपल्या एका मुलाखतीमुळे तो चर्चेत आहे. इंटरव्यूमध्ये तो अनेक मुद्यांवर मोकळेपणाने बोलला आहे. अलीकडे विराट कोहलीबद्दल कुठला ना कुठला माजी क्रिकेटपटू आपल मत मांडत असतो. कोणी विराटच गुणगान करतो, तर कोणी विराट विरोधात बोलतो. अलीकडेच भारताचा लेग स्पिनर अमित मिश्राने विराटबद्दल वक्तव्य केलं.

पैसा आणि फेम मिळाल्यानंतर विराट कोहली बदलला असं अमित मिश्रा म्हणाला. भारतीय क्रिकेटमध्ये धोनी, कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांना जो मानसन्मान मिळतो, तसा सन्मान कोहलीला मिळणार नाही, असं अमित मिश्रा म्हणाला. हे पहिलं प्रकरण नाहीय, याआधी अनेक दिग्गजांनी विराटबद्दल आपल मत व्यक्त केलय. आता मोहम्मद शमी या विषयावर बोलला आहे.

शमीने लगावली चपराक

मोहम्मद शमी शुभंकर मिश्राच्या यू-ट्यूब शो मध्ये आला होता. याच शो मध्ये अमित मिश्राने हे वक्तव्य केलेलं. शमीने या विषायवर आपल मत मांडलं. “अनेक माजी क्रिकेटपटुंना माहितीय की, जेव्हा ते विराट कोहली विरोधात काहीतरी बोलणार, तेव्हाच दुसऱ्यादिवशी त्यांचं नाव वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर येणार. म्हणून जाणीवपूर्वक ते असं करतात” मोहम्मद शमीने असं बोलून विराट बद्दल बोलणाऱ्यांना चपराक लगावली आहे.

मोहम्मद शमीचे टीम इंडियातील बेस्ट फ्रेंड कोण?

विराट कोहलीसोबत आपली बॉन्डिंग खूप चांगली असल्याच मोहम्मद शमी म्हणाला. विराटला नेट्समध्ये माझ्या गोलंदाजीवर बॅटिंग करायला आवडत असही तो म्हणाला. विराटसोबत माझी खूप चांगली बॉन्डिंग आहे. आम्ही नेट्समध्ये परस्परांना आव्हान देत असतो. मजा येते. यातून आमची दोस्ती आणि बॉन्डिंग समजते. विराट आणि इशांत शर्मा बेस्ट फ्रेंड असल्याच शमीने सांगितलं.