मोहम्मद शमीवर पत्नी हसीनाचा जोरदार हल्ला, रोहित शर्माचा फोटो शेअर करत…

mohammed shami wife hasin jahan | हसीन हिने मोहम्मद शमीवर जोरदार हल्ला केला आहे. त्यासाठी तिने रोहित शर्मा याच्या एका फोटोचा आधार घेतला आहे. परंतु या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर हसीन ट्रोल होत आहे.

मोहम्मद शमीवर पत्नी हसीनाचा जोरदार हल्ला, रोहित शर्माचा फोटो शेअर करत...
Jitendra Zavar | Updated on: Jan 29, 2024 | 9:21 AM

नवी दिल्ली, दि.29 जानेवारी 2024 | भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहान यांच्यात वाद सुरु आहे. 2014 मध्ये मोहम्मद शमी आणि हसीन यांचा विवाह झाला होता. दोघे चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर 2018 मध्ये वेगळे झाले. यावेळी हसीन जहान हिने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते. त्याच्याकडून मारहाण होत असल्याचा हसीन हिच्या आरोपानंतर शमीची कारकीर्द धोक्यात आली होती. तो नैराश्यात गेला होता. परंतु कालांतराने तो सावरला. आता पुन्हा हसीन हिने मोहम्मद शमीवर जोरदार हल्ला केला आहे. त्यासाठी तिने रोहित शर्मा याच्या एका फोटोचा आधार घेतला आहे. परंतु या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर हसीन ट्रोल होत आहे.

हसीन हिने कोणती पोस्ट केली

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी याची पत्नी हसीन हिने इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यासाठी तिने भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू रोहित शर्मा आणि त्याची मुलगी इन्वाल्व यांचा फोटोचा आधार घेतला आहे. या पोस्टमधून हसीन हिने शमी याच्यावर निशाणा साधला आहे. तिने पोस्टमध्ये मुलींच्या जीवनात पित्याची भूमिका मांडली आहे. मुलगी आणि वडिलांमधील प्रेम संबंधाची तुलना तिने केली आहे. तसेच काही वडिलांचे नकारात्मक चित्रण दिले आहे.

काय म्हटले कॅप्शनमध्ये

तिने म्हटले आहे की, बहुतेक वडिलांना त्यांच्या मुलीच्या छोट्या कुशीत शांती मिळते. परंतु काही बाप वेश्यांच्या कुशीत असतात. शमीवर तिखट हल्ला करत ती पुढे म्हणाली, “अल्लाह कोणत्याही मुलीला चारित्र्यहीन बाप देऊ नये. मी अल्लाहकडे प्रार्थना करते माझ्या लहान मुलीला धीर दे.”

युजर्सकडून हसीन ट्रोल

हसीन हिच्या या इंस्टाग्राम पोस्टवर युजर्सकडून अनेक कॉमेंट केल्या जात आहेत. काही जणांनी पतीसंदर्भात व्यक्तीगत वक्तव्य करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफार्मचा दुरुउपयोग केल्याबद्दल टीका केली आहे. एक इंस्टाग्राम युजरने म्हटले की, “ड्रामा क्वीन । आणखी एका जणांने रोहित शर्मा याचा फोटो वापल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. संतापात आणखी एक युजर म्हणाला, “तुझ्यासारखी आई कोणाला मिळायला नको” काही पत्नी आपल्या फायद्यासाठी वडिलांकडून त्यांच्या मुलास दूर करत असल्याचा आरोप आणखी एकाने केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us