AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज, विराटचा कितवा नंबर?

England vs India Test Series 2025 : रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार करण्यात आला. शुबमन इंग्लंड दौऱ्यातून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. इंडिया-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम कुणाच्या नावावर आहे? जाणून घ्या.

IND vs ENG : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज, विराटचा कितवा नंबर?
Virat Kohli Team IndiaImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 07, 2025 | 9:30 PM
Share

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिला मालिका असणार आहे. बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.मालिकेतील सलामीचा सामना हा हेडींग्ले, लीड्स येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने इंग्लंड-इंडिया टेस्ट सीरिजमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

विराट कोहली

टीम इंडियाचा माजी फलंदाज विराट कोहली इंडिया-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. विराटने इंग्लंड विरुद्ध कसोटी कारकीर्दीत 28 सामन्यांमध्ये 5 शतकं आणि 9 अर्धशतकांच्या मदतीने 1 हजार 991 धावा केल्या आहेत. विराटने 42.36 च्या सरासरीने या धावा केल्या आहत. विराटने या दरम्यान 5 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली आहेत.

एलिस्टर कूक

इंग्लंडचा माजी कर्णधार दिग्गज एलिस्टर कूक या यादीत चौथ्या स्थानी विराजमान आहे. एलिस्टर कूक याने टीम इंडिया विरुद्ध 2006 ते 2018 दरम्यान 30 कसोटी सामन्यांमध्ये 47.66 च्या सरासरीने 2 हजार 431 रन्स केल्या आहेत. तसेच कूकने या दरम्यान 7 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली आहेत.

सुनील गावसकर

टीम इंडियाचे दिग्गज, माजी कर्णधार, लिटिल मास्टर अर्थात सुनील गावसकर या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत. गावसकर यांनी इंग्लंड विरुद्ध 1971 ते 1986 दरम्यान 38 सामन्यांमध्ये 38.20 च्या सरासरीने 2 हजार 438 रन्स केल्या आहेत. गावसकरांनी या दरम्यान 4 शतकं आणि 16 अर्धशतकं झळकावली आहेत.

सचिन तेंडुलकर

टीम इंडियाचा दिग्गज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 1990 ते 2012 दरम्यान 32 कसोटी सामन्यांमध्ये 2 हजार 535 धावा केल्या आहेत. सचिनने 51.73 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. सचिनने या दरम्यान 7 शतकं आणि 13 अर्धशतकं ठोकली.

जो रुट

इंडिया-इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये जो रुट याच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. जो रुट याने 2012-2024 दरम्यान आतापर्यंत 30 कसोटी सामने खेळले आहेत. रुटने 30 सामन्यांमधील 55 डावांत 58.08 च्या सरासरीने 2 हजार 846 धावा केल्या आहेत. रुटने या दरम्यान 10 शतकं आणि 11 अर्धशतकं झळकावली आहेत.

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?