Mumbai Team: मुंबईच्या टीमने पहिल्यांदाच मिळवलं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच विजेतेपद

| Updated on: Nov 06, 2022 | 8:36 AM

Mumbai Team: मुंबईच्या क्रिकेट टीमने मोठी कामगिरी केली आहे.

Mumbai Team: मुंबईच्या टीमने पहिल्यांदाच मिळवलं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच विजेतेपद
Mumbai Team
Follow us on

कोलकाता: मुंबईच्या क्रिकेट टीमने मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टुर्नामेंट जिंकली. फायनलमध्ये मुंबईच्या टीमने हिमाचल प्रदेश टीमचा पराभव केला. कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर अंतिम सामना झाला. या विजयानंतर मुंबई टीमवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

गोलंदाजांनी अजिंक्य रहाणेचा निर्णय योग्य ठरवला

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई टीमने हिमाचल प्रदेशवर 3 विकेट राखून विजय मिळवला. मुंबईच्या विजयात सर्फराजने 36 तर कोटियनने 3 विकेट घेतल्या. टॉस जिंकून मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणेने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. रहाणेचा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. मुंबईच्या गोलंदाजांनी 9.4 ओव्हरमध्ये हिमाचलच्या 6 विकेट काढल्या होत्या. त्यावेळी स्कोरबोर्डवर हिमाचलच्या 58 धावा होत्या.

हिमाचलला अडचणीतून कोणी बाहेर काढलं?

हिमाचलकडून आकाश वशिष्ठ आणि एकांत सेनने 60 धावांची भागीदारी करुन आपल्या टीमला अडचणीतून बाहेर काढलं. वशिष्ठने 22 चेंडूत 25 धावा केल्या. सेनने 29 चेंडूत 37 धावा केल्या. 20 षटकात हिमाचलने 8 बाद 143 धावा केल्या. स्पिनर तनुश कोटियन (3/15) आणि मध्यमगती गोलंदाज मोहित अवस्थीने (3/21) अशी जबरदस्त गोलंदाजी केली.


पुन्हा एकदा सर्फराज चमकला

मुंबईकडून यशस्वी जैस्वालने 28 चेंडूत 37 धावा केल्या. मुंबईने 3 विकेटने ही मॅच जिंकली. सर्फराज खानने पुन्हा एकदा आपण प्रत्येक फॉर्मेटसाठी योग्य असल्याच सिद्ध केलं. त्याने 31 चेंडूत नाबाद 36 धावा करुन मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.