Mumbai Indians IPL 2022: एका निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचं मिशन फेल, स्वत:ला संभाळलं, पण उशीर झाला होता

| Updated on: May 22, 2022 | 5:34 PM

Mumbai Indians IPL 2022 : 10 टीम्सच्या आयपीएल फॉर्मेटमध्ये यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स सर्वात तळाला असणारा संघ आहे. पाच विजेतेपद मिळवणारा हा संघ पाच सामनेही जिंकू शकला नाही. ग्रुप स्टेजमध्ये मुंबईने 14 पैकी पाच सामने जिंकले

Mumbai Indians IPL 2022: एका निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचं मिशन फेल, स्वत:ला संभाळलं, पण उशीर झाला होता
टिम डेविड आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त एक मॅच खेळला आहे. बिग बॅश लीग मधला अनुभव त्याला मॅच विनर बनवतो. मूळचा सिंगापूरचा असलेल्या टीमने 153.42 च्या सरासरीने बिग बॅशच्या 41 सामन्यात 606 धावा केल्या आहेत.
Follow us on

मुंबई: Mumbai Indians ने यंदाच्या सीजनमध्ये आपल्या चाहत्यांना निराश केलं. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या लीगमधला एक यशस्वी संघ (successfull Team) आहे. चेन्नई, आरसीबी हे संघ लोकप्रिय असले, तरी त्यांना मुंबई इंडियन्ससारखी कामगिरी करणं, जमलेलं नाही. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा IPL चं जेतेपद पटकावलं आहे. मागच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सला जेतेपदाला गवसणी घालणं शक्य झालं नाही. त्यामुळे या सीजनमध्ये मुंबईची टीम ती इच्छा पूर्ण करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण असं घडू शकलं नाही. उलट यंदाचा सीजन चाहतेच नाही, तर फ्रेंचायजीही कधी स्वत:च्या स्मरणात ठेवणार नाही. कारण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खराब कामगिरी मुंबई इंडियन्सने या सीजनमध्ये केली. मुंबईने सलग आठ सामने गमावले. त्यानंतर मुंबईला थोडाबहुत सूर गवसला. निदान काल मोसमाचा शेवट मुंबईने गोड केला. दिल्ली नमवून मुंबई इंडियन्सने लीगमधील शेवटच्या सामन्यात विजय मिळवला. हीच विजयी लय पुढच्या सीजनमध्ये कायम राखावी, अशी तमाम चाहत्यांची इच्छा असेल. मुंबईच्या टीमने सीजनच्या अखेरीस आपल्या चुकांमधून काही बोध घेतला. पण तो पर्यंत उशिर झाला होता.

पाच सामनेही जिंकता आले नाही

10 टीम्सच्या आयपीएल फॉर्मेटमध्ये यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स सर्वात तळाला असणारा संघ आहे. पाच विजेतेपद मिळवणारा हा संघ पाच सामनेही जिंकू शकला नाही. ग्रुप स्टेजमध्ये मुंबईने 14 पैकी पाच सामने जिंकले.

रोहित-इशानची फ्लॉप जोडी

मुंबई इंडियन्सच्या पराभवाची वेगवेगळी कारण आहेत, पण त्यात एक मुख्य कारण आहे सलामीची जोडी. मुंबई इंडियन्सचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशने फ्लॉप ठरले. त्यांनी काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. पण त्यात सातत्य नव्हते. त्यांना मुंबईला ठोस सुरुवात देता आली नाही. रोहितने 14 मॅचमध्ये 19 च्या सरासरीने 268 धावा केल्या. इशान किशनने 14 सामन्यात 418 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 120.11 चा होता.

हे सुद्धा वाचा

टिम डेविडला बाहेर बसवण्याचा निर्णय

मुंबईच्या पराभवाचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे टिम डेविड बद्दलची मुंबईची थिंक टँक स्ट्रॅटजी. मुंबई इंडियन्सने Tim David ला 8.25 कोटी रुपये खर्चून विकत घेतलं होतं. मुंबईने डेविडला सुरुवातीचे दोन सामने खेळवलं. त्यानंतर पुढचे सहा सामने बेंचवर बसवून ठेवलं. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सची ही स्ट्रॅटजी अनेकांना पटली नाही. टिम डेविडला संधी दिली, त्यानंतर त्याने एकहाती सामने फिरवले. पण तो पर्यंत उशीर झाला होता. मुंबईची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली होती. डेविडला सर्व सामन्यांमध्ये खेळवलं असतं, तर कदाचित आज मुंबई प्लेऑफमध्ये दिसली असती. पण हा एक निर्णय महाग पडला.

रिटेन खेळाडूंचा फ्लॉप शो

IPL 2022 साठी मुंबईने चार खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यात सलामीवीर रोहित शर्मा फ्लॉप ठरला. सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला उर्वरित सामन्यांना मुकावं लागलं. जसप्रीत बुमराहला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सूर गवसला नाही. फॉर्म सापडला, तेव्हा उशीर झाला होता. कायरन पोलार्डने 11 सामन्यात फक्त 144 धावा आणि चार विकेट घेतल्या. रिटेन खेळाडूंचं न चालणं, हे सुद्धा मुंबईच्या पराभवाचं एक कारण आहे.