AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिनी लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स चार खेळाडूंना करणार बाहेर, 9 कोटी खर्च केलेल्या प्लेयरचं नाव यादीत!

आयपीएल स्पर्धेत गेल्या काही वर्षात मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार राहिली आहे. सलग पाच पर्वात मुंबईच्या पदरी निराशा पडली आहे. हार्दिक पांड्याच्या हाती सूत्र सोपवूनही फ्रेंचायझीला फार काही फायदा झाला नाही. असं असताना मिनी लिलावापूर्वी संघात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

मिनी लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स चार खेळाडूंना करणार बाहेर, 9 कोटी खर्च केलेल्या प्लेयरचं नाव यादीत!
मिनी लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स चार खेळाडूंना करणार बाहेर, 9 कोटी खर्च केलेल्या प्लेयरचं नाव यादीत!Image Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Oct 24, 2025 | 4:44 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्वच संघांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मिनी लिलावापूर्वी कोणते प्लेयर्स ठेवायचे आणि कोणते काढायचे यावर खलबतं सुरु आहेत. तसेच ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंबाबत बोलणीही सुरु आहेत. मिनी लिलाव डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे सर्वच संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. यावेळी सर्वांच्या नजरा या मुंबई इंडियन्स संघावर खिळल्या आहेत. कारण पाचवेळा जेतेपदाची चव चाखलेल्या मुंबई इंडियन्सला मागची पाच वर्षे काही खास गेली नाही. त्यामुळे 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात सहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी खेळाडूंची जुळवाजुळव करण्याची धडपड सुरु झाली आहे. मागच्या पर्वात मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. पण एलिमिनेटर फेरीत गुजरातकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे मिनी लिलावापूर्वी संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. खासकरून पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

अफगाणिस्तानचा लेगस्पिनर गझनफर याला मिनी लिलावापूर्वी रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. कारण आयपीएल 2025 स्पर्धेत एकही सामना खेळला नाही. त्याच्यासाठी फ्रेंचायझीने 4.8 कोटी मोजले होते. मिशेल सँटनर संघात असल्याने त्याला संधी मिळाली आहे. त्यात अलिकडे खेळलेल्या स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी काही विशेष नव्हती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टॉपली यालाही रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. मागच्या पर्वात एकच सामना खेळला होता. त्याच्यासाठी फ्रेंचायझीने 75 लाख मोजले होते.

दीपक चहरचं नावही या यादीत असण्याची शक्यता आहे. कारण मेगा लिलावात त्याच्यासाठी मुंबईने 9.25 कोटी मोजले होते. पण त्याची कामगिरी काही खास राहिली नाही. त्याने 14 सामन्यात फक्त 11 विकेट घेतले. संघात ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह असताना इतर स्वस्त आणि मस्त पर्याय शोधला जाण्याची शक्यता आहे. दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिझाड विल्यम्स यालाही रिलीज केलं जाऊ शकते. त्याने मागच्या पर्वात एकही सामना खेळला नाही. फक्त नेट प्रॅक्टिसमध्ये वेळ घालवला. त्यासाठी फ्रेंचायझीने 75 लाख मोजले होते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...