MI Playoff IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमधील प्रवेशानंतर सचिन तेंडुलकरच्या टि्वटची का होतेय चर्चा?

| Updated on: May 22, 2023 | 1:47 PM

MI Playoff IPL 2023 : मुंबईने त्यांचा SRH विरुद्धचा सामना जिंकला. पण त्यांना RCB विरुद्ध GT सामन्याच्या निकालावर अवलंबून रहाव लागलं. कारण गुजरातच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा मार्ग मोकळा झाला.

MI Playoff IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमधील प्रवेशानंतर सचिन तेंडुलकरच्या टि्वटची का होतेय चर्चा?
Sachin Tenulkar
Follow us on

मुंबई : IPL 2023 ची लीग स्टेज खूपच रंगतदार झाली. अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत उत्कंठा ताणली गेली. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ कोणता? हे शेवटच्या सामन्यानंतर ठरलं. रविवारी डबल हेडर सामने झाले. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये झाला. या हायस्कोरिंग मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने 18 व्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. हैदराबादच 200 धावांच मोठ लक्ष्य मुंबईने सहज पार केलं. त्यानंतर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्समध्ये झाला.

मुंबईने त्यांचा SRH विरुद्धचा सामना जिंकला. पण त्यांना RCB विरुद्ध GT सामन्याच्या निकालावर अवलंबून रहाव लागलं. कारण गुजरातच्या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा मार्ग मोकळा झाला.

आयपीएलमध्ये एकाच तीन दिवसात तीन सेंच्युरी

आयपीएलमध्ये काल एकूण तीन शतक पहायला मिळाली. आधी कॅमरुन ग्रीनने SRH विरुद्ध मॅच विनिंग सेंच्युरी झळवकली. त्यानंतर RCB विरुद्ध GT सामन्यात आधी विराट कोहलीने सेंच्युरी झळकवली. त्यानंतर शुभमन गिलने. विराटच्या शतकामुळे आरसीबीने धावांचा डोंगर उभारला. पण गिलच्या शतकाने बँगलोरच्या विजयाचा घास हिरावला.

200 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग

शुभमन गिलने काल RCB च्या बॉलर्सना धुतलं. 52 चेंडूत नाबाद 104 फटकावताना त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली. गुजरातच्या विजयामुळे मुंबई प्लेऑफमध्ये इन झाली. RCB ची टीम बाहेर गेली. क्वालिफायर 1 मध्ये आता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना होणार आहे.

सचिनच्या टि्वटची चर्चा

एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या टीम भिडतील. कालचे सामने झाल्यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने एक टि्वट केलय. त्याची बरीच चर्चा होतेय. मुंबई पलटनसाठी चांगली बॅटिंग केल्याबद्दल सचिनने कॅमरुन ग्रीन आणि शुभमन गिलच कौतुक केलय.


विराट कोहलीची लागोपाठ शतकं खूप सुंदर होती. त्यांच्याकडे स्वत:ची पद्धत आणि क्लास आहे. मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये पाहून आनंद झाला, असं सचिनने म्हटलय.