New Zealand : ट्रेन्ट बोल्ट आऊट, रवींद्रला संधी, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघ जाहीर, टीम इंडियाविरुद्ध भिडणार

New Zealand Squad For Ic Champions Trophy 2025 : न्यूझीलंडने पाकिस्तान आणि यूएईत होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. न्यूझीलंडने पहिल्यांदाच 3 खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी दिली आहे.

New Zealand : ट्रेन्ट बोल्ट आऊट, रवींद्रला संधी, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघ जाहीर, टीम इंडियाविरुद्ध भिडणार
new zealand cricket team
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 12, 2025 | 5:50 PM

न्यूझीलंडने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडने 15 सदस्यीय संघ जाहीर केला. मिचेल सँटनर हा या 15 सदस्यीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर वेगवान आणि अनुभवी गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट याला संधी मिळालेली नाही. तसेच असे 3 खेळाडू आहेत ज्यांना पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे. बेन सियर्स, विलियम ओरुर्के आमि नॅथन स्मिथ या तिघांना पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेसाठी संधी मिळालीय. आयसीसीने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं 2017 नंतर पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे. मिचेल सँटनर याची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे सँटनरसमोर मोठं आव्हान असणार आहे. सँटनर याची अवघ्या काही दिवसांपूर्वीच कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच सँटनर 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळाडू म्हणून खेळला होता.

मिचेल सँटनर, केन विलियमसन आणि टॉम लॅथम या तिघांना चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याचा अनुभव आहे. सँटनरसह केन आमि लॅथम हे दोघेही 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी झाले होते. त्यामुळे यंदा या तिघांकडून टीम मॅनजमेंटला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

भारतीय वंशाचा रचीन रवींद्र, डेव्हॉन कॉन्वहे आणि विल यंग या त्रिकुटावर टॉप ऑर्डरची भिस्त असणार आहे. डॅरेल मिचेल आणि मार्क चॅपमॅन या दोघांवर मिडल ऑर्डरची मदार असेल. मॅट हॅन्री आणि लॉकी फर्ग्यूसन या दोघांवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. तर ऑलराउंडर कॅप्टन मिचेल सँटनरसह, ग्लेन फिलिप्स आणि मायकल ब्रेसवेल या त्रिकुटावर फिरकी गोलंदाजांची जबाबदारी असणार आहे.

न्यूझीलंडचं त्रिकुट चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिल्यांदाच खेळणार

दरम्यान न्यूझीलंडचा या स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंड साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. हा सामना 2 मार्च रोजी दुबईत होणार आहे. न्यूझीलंड दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 24 फेब्रुवारी रोजी रावळपिंडी येथे होईल. तर किवी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याने 19 फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीतील मोहिमेला सुरुवात करेल.

न्यूझीलंडचं वेळापत्रक

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, बुधवार 19 फेब्रुवारी, कराची.

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, सोमवार, 24 फेब्रुवारी, रावळपिंडी.

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया, रविवार, 2 मार्च, दुबई.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कॅप्टन), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, विल ओरुर्के, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, बेन सियर्स, नाथन स्मिथ, केन विलियमसन आणि विल यंग.