AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला नेमकं झालय तरी काय? प्रचंड निराश, दोन शब्दांमध्ये व्यक्त केलं आपलं दु:ख

15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने यावर्षीचा आयपीएल हंगाम चांगलाच गाजवला. आपल्या बॅटच्या जोरदावर त्याने भल्या-भल्या बॉलरला पाणी पाजलं. परंतु सध्या तो दु:खी असल्याचं पहायला मिळत आहे. त्याची एक पोस्ट चांगलीच चर्चेमध्ये आली आहे.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीला नेमकं झालय तरी काय? प्रचंड निराश, दोन शब्दांमध्ये व्यक्त केलं आपलं दु:ख
Vaibhav SuryavanshiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 2:58 PM
Share

15 वर्षीय आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीला वेस्टइंडीज विरोधातील मागच्या चारही टी20 सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकलेलं नाहीये. त्याची या मालिकेसाठी निवड तर झाली. मात्र चारही सामन्यात त्याच्यावर बेंचवर बसून राहण्याची वेळ आली. त्यानंतर आता शेवटच्या आणि निर्णयाक सामन्यामध्ये देखील त्याला संधी मिळेल याची शक्यता खूपच कमी आहे. भारत आणि वेस्टइंडीजमध्ये पाच ट्वि20 सामन्यांची मालिका सुरू आहे. ज्यामध्ये दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर दोन सामने वेस्टइंडीज संघाने जिंकले आहेत. तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे आता शेवटचा सामना मालिका विजयासाठी निर्णायक ठरणार असल्यामुळे दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावणार आहेत.

त्यामुळे वैभव सूर्यवंशीला पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात देखील अंतिम आकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या भारताचे ओपनर फलंदाज संजू सॅमनस आणि अभिषेक शर्मा हे धडाकेबाज कामगिरी करत आहेत. त्यामुळे शेवटच्या आणि मालिका विजयासाठी निर्णायक असलेल्या सामन्यामध्ये संजू सॅमसन किंवा अभिषेक शर्मा यांना वगळून वैभव सूर्यवंशीला संधी देण्याची रिस्क टीम मॅनेजमेंट घेण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आता वैभव सूर्यवंशीने आपल्या मनातील दु:ख सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. त्याने अवघ्या दोन शब्दांची पोस्ट केली आहे.

नेमकं काय म्हटलं वैभव सूर्यवंशीने?

सलग चार सामन्यात संघामध्ये स्थान मिळून न शकल्याने अखेर आता वैभव सूर्यवंशीचा संयम सुटल्याचं पहायला मिळत आहे. त्याने दोन शब्दांची पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट केली आहे. ‘मला अजूनही विश्वास वाटतो’ अशा शब्दात वैभव सूर्यवंशीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. सलग चार सामन्यांमध्ये संधी न मिळाल्याने वैभव सूर्यवंशी निराश असल्याचं त्याच्या या पोस्टवरून दिसून येत आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल