AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SA : अमेलिया केरची विक्रमी खेळी, न्यूझीलंडकडून 347 धावांचा यशस्वी पाठलाग, भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

New Zealand vs South Africa Womens 2nd Odi Match Result : कॅप्टन अमेलिया केर हीने केलेल्या विक्रमी खेळीमुळे न्यूझीलंड मार्च एन्डिंगचा शेवट गोड करण्यात यशस्वी ठरली. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

NZ vs SA : अमेलिया केरची विक्रमी खेळी, न्यूझीलंडकडून 347 धावांचा यशस्वी पाठलाग, भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Amelia Kerr NZW vs SAW 2nd OdiImage Credit source: Icc X account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 01, 2026 | 6:52 PM
Share

यजमान न्यूझीलंड वुमन्स क्रिकेट टीमने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 सामन्यांची टी 20I मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. मात्र त्यानंतर न्यूझीलंड 3 सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला पराभूत करुन मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यामुळे न्यूझीलंडसाठी दुसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने करो या मरो असा होता. या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडने कमाल केली. कॅप्टन अमेलिया केर हीने ऐतिहासिक खेळी करुन न्यूझीलंडला अविस्मरणीय असा विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करुन टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.

न्यूझीलंडकडून पहिल्या पराभवाचा हिशोब, मालिकेत बरोबरी

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यांचं आयोजन हे मंगळवारी 31 मार्च रोजी वेलिंग्टनमधील बासिन रिव्हर्स इथे करण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेने विजयसाठी दिलेलं 347 धावांचं आव्हान न्यूझीलंडने 2 बॉलआधी 2 विकेट्स राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडने 49.4 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 350 रन्स केल्या आणि ऐतिहासिक असा विजय मिळवला. न्यूझीलंडने यासह पहिल्या पराभवाची परतफेड करत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

सामन्यात काय झालं?

न्यूझीलंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी बोलावलं. दक्षिण आफ्रिकेने या संधीचा फायदा घेत 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 346 धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेसाठी तिघींनी 50 पेक्षा अधिक धावा केल्या. एनेके बॉश हीने 91, कॅप्टन लॉरा वॉल्डवॉर्ड्ट 69 आणि क्लो ट्रायोन हीने 52 धावांची खेळी केली. तसेच इतरांनीही योगदान दिलं. त्यामुळे न्यूझीलंडसाठी 347 धावांचं हे आव्हान पार करणं प्रचंड अवघड आणि आव्हानात्मक ठरणार होतं. मात्र न्यूझीलंडची कॅप्टन अमेलिया आणि इतर सहकाऱ्यांनी कमाल केली.

अमेलिया केरची ऐतिहासिक खेळी

अमेलिया न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करत ती विजयाची शिल्पकार ठरली. अमेलियाने 139 चेंडूत नाबाद 179 धावांची विक्रमी खेळी साकारली. अमेलियाने या खेळीत 23 चौकार आणि 1 षटकार लगावला. अमेलिया व्यतिरिक्त इसाबेला हीने 68 धावा केल्या. तर इतरांनीही छोटेखानी मात्र निर्णायक योगदान दिलं.

वुमन्स टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

न्यूझीलंडने या विजयासह दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि भारतालाही झटका दिला. न्यूझीलंडने भारताच्या नावावर असलेला सर्वाधिक रन्स चेज करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. याआधी हा विक्रम भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नावावर होता. भारताने वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध 339 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा