AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs AUS 3rd Odi : जोश इंग्लिसने लाज राखली, पाकिस्तानकडून ऑस्ट्रेलियाचं 157 धावांवर पॅकअप, कोण जिंकणार?

Pakistan vs Australia 3rd ODI : मालिका 1-1 ने बरोबरीत असल्याने क्रिकेट चाहत्यांना ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारले असं वाटलं होतं. मात्र पकिस्तानच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेर झाले.

PAK vs AUS 3rd Odi : जोश इंग्लिसने लाज राखली, पाकिस्तानकडून ऑस्ट्रेलियाचं 157 धावांवर पॅकअप, कोण जिंकणार?
Josh Inglis PAK vs AUSImage Credit source: Australian Mens Cricket Team Facebook Page
| Updated on: Jun 04, 2026 | 9:22 PM
Share

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने लाहोरमधील गद्दाफी क्रिकेट स्टेडियममध्ये पाकिस्तानसमोर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात गुडघे टेकले आहेत. पाकिस्तानने धारदार बॉलिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 8 ओव्हरआधीच ऑलआऊट केलं. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचं 42 ओव्हरमध्ये 157 धावांवर पॅकअप केलं. त्यामुळे पाकिस्तानला विजयसाठी 158 धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आहे. आता पाकिस्तान सामन्यासह मालिका जिंकण्यात यशस्वी ठरणार की कांगारु 157 धावांचा यशस्वी बचाव करत सीरिज आपल्या नावावर करणार? हे येत्या काही तासांतच स्पष्ट होईल.

पहिल्या डावात काय झालं?

ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन जोश इंग्लिस याने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र कर्णधाराचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियासाठी फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. मार्नस लबुशेन आणि एलेक्स कॅरी या दोघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र दोघांनाही या खेळीला मोठ्या आकड्यात बदलता आलं नाही. लबुशेन आणि कॅरी या दोघांनी प्रत्येकी 19-19 धावा केल्या. एडम झॅम्पा याने 10 धावा केल्या. तर जोश इंग्लिस याचा अपवाद वगळता एकालाही मोठी खेळी साकारता आली नाही. जोशने अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाची लाज राखली. जोशच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानसमोर 150 पार पोहचता आलं.

कॅप्टन जोश इंग्लिसची झुंजार खेळी

जोशने ऑस्ट्रेलियसााठी 71 बॉलमध्ये 91.55 च्या स्ट्राईक रेटने 65 रन्स केल्या. जोशने या खेळीत 1 सिक्स आणि 8 फोर ठोकले. पाकिस्तानसाठी कॅप्टन शाहीन शाह अफ्रिदी याने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. शाहीनने फक्त 3.80 च्या इकॉनमीने 8 ओव्हरमध्ये 30 रन्सच्या मोबदल्यात 3 विकेट्स मिळवल्या. अब्रार अहमद आणि शादाब खान या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर हरीस रौफ याने 1 विकेट मिळवली.

ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी

दरम्यान पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 38 धावांच्या मोबदल्यात 7 झटके देऊन पॅकअप केलं. एलेक्स कॅरी आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची 3 आऊट 98 अशी स्थिती झाली होती. त्यानंतर कॅमरुन ग्रीन आणि जोश इंग्लिस या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 24 बॉलमध्ये 21 रन्सची पार्टनरशीप केली. ऑस्ट्रेलिया टीमची 3 आऊट 119 रन्स अशी स्थिती होती. मात्र जोश इंग्लिस आऊट होताच ऑस्ट्रेलियाची पडझड झाली. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 38 धावांच्या मोबदल्यात 7 झटके देत ऑलआऊट केलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...