Odi Cricket : 3 संघ, 4 सामने आणि 6 दिवस, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी तिरंगी मालिका, पाहा वेळापत्रक

Tri Series 2025 Schedule And Live Streaming : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी 3 संघात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. जाणून घ्या सर्वकाही.

Odi Cricket : 3 संघ, 4 सामने आणि 6 दिवस, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी तिरंगी मालिका, पाहा वेळापत्रक
champions trophy 2025
Image Credit source: AFP
| Updated on: Feb 07, 2025 | 1:20 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. त्याआधी या स्पर्धेतील सहभागी 8 संघ तयारीला लागले आहेत. टीम इंडिया मायदेशात इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने महत्त्वाची आहे. टीम इंडियाने या मालिकेतील सलामीचा सामना जिंकत जबरदस्त सुरुवात केली आहे. तर दुसरा सामना 9 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. त्याआधी 8 फेब्रुवारीपासून त्रिसदस्यीय एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत चॅम्पियन्स ट्रॉफीतील 3 संघ आमनेसामने असणार आहेत.

या त्रिसदस्यीय (ट्राय)मालिकेचं आयोजन चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे पाकिस्तानमध्ये करण्यात आलं आहे. या मालिकेत यजमान पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे 3 संघ खेळणार आहेत. या मालिकेत फायनलसह एकूण 4 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघ या मालिकेत 2 सामने खेळणार आहे. मालिकेला 8 फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे. तर 14 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील चारही सामने कराची आणि रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे तिन्ही संघांचा चॅम्पियन्स ट्रॉफीआधी चांगला सराव होईल, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही.

या मालिकेतील सर्व सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळतील?

या मालिकेतील सर्व सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तर सोनी लिव्ह एपवरुन लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवता येईल.

ट्राय सीरिजचं वेळापत्रक

  1. शनिवार 8 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  2. सोमवार, 10 फेब्रुवारी, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
  3. बुधवार, 12 फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
  4. शुक्रवार, अंतिम सामना, नॅशनल स्टेडियम, कराची

ट्राय सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम : टेम्बा बावुमा (कॅप्टन), ईथन बॉश, मॅथ्यू ब्रीट्जके, जूनियर डाला, वियान मुल्डर, मिहलाली म्पोंगवाना, सेनुरन मुथुसामी, गीडियन पीटर्स, मीकाएल प्रिन्स आणि जेसन स्मिथ.

ट्राय सीरिजसाठी न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओरुर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग आणि ​​जेकब डफी.

ट्राय सीरिजसाठी पाकिस्तान टीम: मोहम्मद रिझवान (कॅप्टन), सलमान अली आगा (उपकर्णधार), बाबर आझम, फखर जमां, कामरान गुलाम, सऊद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह आणि शाहीन शाह अफ्रिदी.