
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आर्मी ट्रेनिंग घेऊनही फारसा काही फायदा झालेला नाही. अमेरिकेनंतर भारतानेही पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे आता सुपर 8 फेरीचं दोन सामन्यातील विजयासह इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. पाकिस्तानचा सामना कॅनडाशी होत असून नाणेफेकीचा कौल बाबर आझमच्या बाजूने लागला. क्षणाचाही विलंब न करता बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीनंतर प्लेइंग 11 बाबत सांगताना बाबर आझम म्हणाला की, इफ्तिखार अहमदच्या जागी सैम अय्यूबला संधी दिली आहे. इफ्तिखार अहमदला एका व्हिडीओला लाईक करण्याची शिक्षा मिळाल्याची चर्चा आता रंगली आहे. इफ्तिखारने इमाद वसीम विरुद्ध व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओला लाईक केलं होतं.
इमादने भारताविरुद्ध संथगतीने खेळला होता आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इफ्तिखार अहमदने हा व्हिडीओला लाईक केलं होतं. त्यानंतर ते लाईक काढलं. दुसरीकडे, इफ्तिखार अहमद टी20 वर्ल्डकपमध्ये काही खास करू शकलेला नाही. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरला. अमेरिकेविरुद्ध 18 आणि भारताविरुद्ध 5 धावा केल्या. दुसरीकडे सैम अय्यूब ओपनिंग करताना दिसणार आहे. तर बाबर आझम वन डाऊन उतरणार आहे.
पाकिस्तान आता उरलेल्या दोन पैकी एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं तर गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई आहे. दुसरीकडे अमेरिका आणि भारताच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागणार आहे. या दोन्ही संघाच्या कामगिरीत काही गडबड झाली तरच पाकिस्तानला संधी मिळू शकते.
कॅनडा (प्लेइंग इलेव्हन): आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), रविंदरपाल सिंग, साद बिन जफर (कर्णधार), डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सैम अयुब, बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर.