AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी मिळाली, आता पगार किती मिळणार? आकडा पाहून व्हाल थक्क!

अजित आगरकर यांच्यानंतर प्रज्ञान ओझा यांच्याकडे भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पदासाठी त्यांना किती पगार मिळणार? जाणून घेऊयात....

टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी मिळाली, आता पगार किती मिळणार? आकडा पाहून व्हाल थक्क!
Pragyan Ojha SalaryImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 7:00 PM
Share

गेल्या अनेक दिवसांपासून बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या जागी नव्या व्यक्तीच्या निवडीची चर्चा सुरु होती. त्यानंतर आता आज १९ ऑक्टोबर २०२६ रोजी बीसीसीआयने यासंदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे. अजित आगरकरांनी पद सोडल्यानंतर त्यांच्याजागी माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची हंगामी मुख्य निवडकर्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्य निवडकर्ता म्हणून काम करणाऱ्या पदाच्या पगारामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता माजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकरांप्रमाणेच प्रज्ञान यांनाही पगार मिळणार आहे.

दरम्यान, माजी भारतीय फिरकीपटू रमेश पवार यांचीही निवड समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या ५ सदस्यीय समितीमध्ये प्रज्ञान ओझा, शिवसुंदर दास, आर. पी. सिंह, अजय रात्रा आणि रमेश पवार यांचा समावेश आहे. अजित आगरकर यांच्याप्रमाणेच प्रज्ञान ओझा यांना वर्षाला ३ कोटी रुपये वार्षिक पगार म्हणजे २५ लाख प्रति महिना मिळणार आहे.

दरम्यान, आता प्रज्ञान ओझा मुख्य निवडकर्ता म्हणून समितीचे नेतृत्व करणार आहेत आणि त्यांच्यासोबत इतर चार सदस्य असणार आहेत. निवड समितीत प्रज्ञान ओझा (अध्यक्ष/मुख्य निवडकर्ता), शिव सुंदर दास, आरपी सिंग, अजय रात्रा आणि रमेश पवार यांचाही समावेश आहे. या सर्वांना खेळाडू म्हणून मोठा अनुभव असून, भारतीय संघाचे भविष्य आता त्यांच्या हातात आहे. त्यामुळे पुढे आता संघाची कामगिरी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रज्ञान ओझांची कारकीर्द कशी ?

३८ वर्षीय प्रज्ञान ओझा यांनी भारतासाठी २४ कसोटी, १८ एकदिवसीय आणि ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळून एकूण १४४ आंतरराष्ट्रीय बळी घेतले आहेत. मुख्य निवडकर्ता म्हणून, आगामी आयसीसी स्पर्धा आणि परदेश दौऱ्यांसाठी एक मजबूत राखीव खेळाडूंचा संघ तयार करणे, हे त्याचे मुख्य लक्ष असणार आहे. दरम्यान, प्रज्ञान ओझा आणि रमेश पवार ही जोडी भारतीय फिरकी गोलंदाजी मजबूत करण्यात आणि युवा प्रतिभेला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

Follow Us
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?