प्रीति झिंटामुळे सामनावीराच्या पुरस्काराचा मानकरी बदलला, झालं असं की…! आयपीएल खेळाडूचा खुलासा

आयपीएल स्पर्धेतील अनेक घटनांचा खुलासा उशिरा का होईना होत आहे. 18 वर्षानंतर हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्यातील वादाचा व्हिडीओ समोर आला होता. आता आणखी एक खुलासा क्रिकेटपटूने केला आहे. प्रीति झिंटाने प्लेयर ऑफ मॅचचा मानकरी कसा बदलला त्याबाबत सांगितलं.

प्रीति झिंटामुळे सामनावीराच्या पुरस्काराचा मानकरी बदलला, झालं असं की...! आयपीएल खेळाडूचा खुलासा
प्रीति झिंटामुळे सामनावीराच्या पुरस्काराचा मानकरी बदलला, झालं असं की...! आयपीएल खेळाडूचा खुलासा
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 05, 2025 | 3:57 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्स संघ अंतिम फेरी गाठू शकला. पण अंतिम फेरीत आरसीबीकडून पराभव झाला आणि पहिल्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं. असं असलं तरी प्रीति झिंटा मात्र आपल्या खेळाडूंना कायम प्रेरणा देत राहिली. प्रीति झिंटा प्रत्येक सामना पाहण्यासाठी मैदानात हजर होती. त्यामुळे तिचा अंदाज पंजाब किंग्सच्या चाहत्यांना खूपच भावला होता. आता प्रीति झिंटाबाबत एक खुलासा क्रिकेटपटू संदीप शर्मा याने केला आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितलं की, कसं प्रीति झिंटाच्या सांगण्यावरून प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी बदलला होता. संदीप शर्मा भारतासाठी फक्त दोन टी20 सामने खेळला आहे. तर आयपीएलमध्ये तीन संघांसाठी खेळला असून 146 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा फक्त 8.06 इतका प्रती ओव्हर आहे.

संदीप शर्माने सांगितलं की, एक आयपीएल सामना बंगळुरुत झाला होता. तिथे प्रीति झिंटाने रवि शास्त्रींना सांगून प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी बदलला होता. संदीप शर्मा म्हणाला की, ‘बंगळुरुत एका आयपीएल सामन्यात मी नव्या चेंडूने तीन विकेट घेतल्या होत्या. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांना बाद केलं होतं. पण या सामन्यात अक्षर पटेलला प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मिळणार होता. कारण त्याने दोन विकेट आणि 25 धावा केल्या होत्या. पण प्रीति मॅमने रवि शास्त्री यांना सांगून प्लेयर ऑफ द मॅच सँडी असेल असं सांगितलं.’

संदीप शर्माने प्रीति झिंटासोबत श्रेयस अय्यरबाबतही खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की, कोणत्या संघाला आयपील अंतिम फेरीत पोहोचवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही भारतीय संघाचे कर्णधार व्हाल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट एक वेगळं आव्हान आहे. संदीप शर्मा श्रेयस अय्यरबाबत म्हणाला की, ‘श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्याची चर्चा सुरु आहे कारण की त्याने आयपीएलमध्ये संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. पण असं म्हणणं चुकीचं आहे. सूर्यकुमार यादव कोणत्याही आयपीएल संघाचं कर्णधारपद भूषवत नाही. म्हणजेच तसा काही मुद्दाच येत नाही. भारतीय संघ एक वेगळी टीम आहे. लोकांना ही बाब समजली पाहीजे.’