AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयंत पाटलांना मंत्रिपद, सुप्रिया सुळे यांना…राष्ट्रवादी विलीनीकरणाची इनसाईड स्टोरी समोर; नेमका फॉर्म्यूला काय होता?

दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण होणार होते, असे सांगितले जात आहे. विलीनीकरण झाल्यास राष्ट्रवादी पक्षात कोणाला काय अधिकार मिळणार याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

जयंत पाटलांना मंत्रिपद, सुप्रिया सुळे यांना...राष्ट्रवादी विलीनीकरणाची इनसाईड स्टोरी समोर; नेमका फॉर्म्यूला काय होता?
sharad pawar and ajit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 02, 2026 | 5:56 PM
Share

NCP Merger : राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या विलीनीकरणाची चर्चा चालू झाली आहे. खासदार शरद पवार यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार होते. तारीख ठरली होती, असे सांगितले आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या सर्वच नेत्यांनी हा दावा खरा असल्याचे सांगितले. तर अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील एकत्रीकरणाची चर्चा चालू असती, तारीख निश्चित झाली असती तर त्याबाबत अजितदादांनी आम्हाला सांगितले असते असे सांगत शरद वार यांच्या मताशी असहमती दर्शवली. असे असतानाच आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रादीचे दोन्ही एकत्र आल्यानंतर अधिकारांचं वाटप आणि एकत्र झालेली राष्ट्रवादी नेमकी कसी असेल याबाबतची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.

कोणाला काय मिळणार होते? अधिकारांचे वाटप कसे?

सूत्राच्या माहितीनुसार अजित पवार यांचा पक्ष आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतची सर्व तयारी झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाची घोषणा झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार होतं. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार होती. अजितदादा यांना राज्यातील सर्व अधिकार दिले जाणार होते. तर आमदार जयंत पाटील यांना मंत्रिपद, रोहित पवार यांना राज्यात राज्यमंत्रिपद दिलं जाणार होतं. विशेष म्हणजे शरद पवार हेच पक्षाच्या सर्वोच्च स्थानी असणार होते.

शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार होता?

दरम्यान, सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार होते असे म्हटले जात आहे. तसेच जयंत पाटील आणि रोहित पवार यांनादेखील मंत्रिपद दिले जाणार होते असे सांगितले जात असेल तर शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच आता शरद पवार यावर नेमके काय स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार