AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचे निर्णय आम्ही घेऊ..विलिनीकरणाबाबतच्या फडणवीसांच्या त्या उत्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

"सर्व गोष्टींचा मी साक्षीदार आहे. आम्हाला या गोष्टीत राजकारण करायचं नाही, मात्र जर अजितदादा असा कोणता निर्णय घेणार असतील तर त्यांनी आधी भाजपसोबत चर्चा केली असती" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

आमचे निर्णय आम्ही घेऊ..विलिनीकरणाबाबतच्या फडणवीसांच्या त्या उत्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका
Devendra fadnavis-Sunil Tatkare
| Updated on: Feb 02, 2026 | 12:44 PM
Share

महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्मयंत्री सुनेत्रा पवार आज कराड प्रिती संगमावर येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हण यांच्या समाधीस्थळासमोर नतमस्तक झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे गेले. शरद पवार, सुप्रिया सुळे यांना शपथविधीचं निमंत्रण दिलं नाही या प्रश्नावर सुनील तटकरे बोलले की, “शपथ विधी होणार असल्यावर राज शिष्टाचार विभागाकडून ते पाहिलं जातं. विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर पत्र सादर केलं. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी शपथ नक्की केली. पार्थ पवार त्या दिवशी बारामतीमध्ये होते. सांत्वनपर भेटी नंतर पार्थ पवार मुंबईला आले” असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबत पुढाकार कोणी घ्यावा? “आम्ही एनडीए मध्ये आहोत. या निर्णयाशी ज्यांची अनुकूलता असेल त्यांनी त्या बाबत विचार करायचा आहे. त्यानंतर स्पष्टता येईल” दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणावर सुनील तटकरे यांनी इतकं स्पष्ट उत्तर दिलं.

मुख्यमंत्री विलिनीकरणावर काय म्हणालेले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाराचा दावा खोडून काढला. ते म्हणाले की, “अजितदादा प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करत होते, सर्व गोष्टींचा मी साक्षीदार आहे. आम्हाला या गोष्टीत राजकारण करायचं नाही, मात्र जर अजितदादा असा कोणता निर्णय घेणार असतील तर त्यांनी आधी भाजपसोबत चर्चा केली असती”

राष्ट्रवादी स्वतंत्र बाण्याचा पक्ष

आज याच मुद्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “भाजप हा केंद्रातील आणि राज्यातील मोठा पक्ष आहे. राष्ट्रवादी पक्ष हा मित्र पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहे. भाजपने आम्ही काय निर्णय घ्यावे हे कधी ही सांगितलेलं नाही. राष्ट्रवादी स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे. आमचे निर्णय आम्ही घेऊ. ज्यावेळी चर्चा सुरू होईल त्यावेळी ते निर्णय होईल.आमची वेगळी भूमिका असण्याचे कारण नाही .राष्ट्रवादी ने नव्याने घेतलेली भूमिका ठळक पने मांडण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न केले आहेत”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले की, “अजितदादा विलिनीकरणाबाबत कोणता निर्णय घेणार असतील तर त्यांनी आधी भाजपसोबत चर्चा केली असती” आज सुनील तटकरे यांनी याच मुद्यावर बोलताना “राष्ट्रवादी स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे. आमचे निर्णय आम्ही घेऊ” असं म्हणाले.

Follow Us
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार