AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस्स..आता खूप झालं! प्रीति झिंटाचा पारा चढला, पंजाब किंग्जबद्दल अफवा पसरल्याने संताप अनावर

जाब किंग्ज या संघातील शिस्त तसेच खेळाडू यांच्याबाबत अनेक दावे केले जात आहेत. या संघाचा सलामीवर प्रबसिमरन सिंह याचे एकाच आठवड्यात तब्बल 10 किलो वजन वाढल्याचा दावा केला जातोय.

बस्स..आता खूप झालं! प्रीति झिंटाचा पारा चढला, पंजाब किंग्जबद्दल अफवा पसरल्याने संताप अनावर
preity zinta and punjab kingsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2026 | 9:55 PM
Share

 Punjab Kings :सध्या आयपीएल 2026 चा हंगाम सुरू आहे. या हंगामात पंजाब किंग्ज या संघाने जोरदार सुरुवात केली. परंतु नंतर मात्र या संघाने सलग चार सामने गमावले. सलग चार तासांत पराभव झाल्यामुळे आता या संघाच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सोबतच या संघातील शिस्त, खेळाडूंचे आरोग्य याबाबतही अनेक दावे केले जात आहेत. असे असतानाच पंजाब किंग्ज या संघाची मालकीण असलेली अभिनेत्री प्रीति झिंटा चांगलीच भडकली आहे. आपल्या संघाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याने जाहीर नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले आहेत.

पंजाब किंग्ज संघाबद्दल काय सांगितले जात आहे?

पंजाब किंग्ज या संघातील शिस्त तसेच खेळाडू यांच्याबाबत अनेक दावे केले जात आहेत. या संघाचा सलामीवर प्रबसिमरन सिंह याचे एकाच आठवड्यात तब्बल 10 किलो वजन वाढल्याचा दावा केला जातोय. तसेच काही खेळाडू रात्री उशिरापर्यंत क्रिकेट खेळत राहतात. काही खेळाडू ट्रेनिक सेशनलाही अनुपस्थित राहतात. फ्लाईटही मिस करत आहेत. यामुळेच पंजाबच्या संघाची कामगिरी बिघडली आहे, असा दावा केला जातोय.

प्रीति झिंटा नेमकं काय म्हणाली?

दुसरीकडे आपल्या संघाबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत असल्याने प्रीती झिंडा खूपच भडकली आहे. टीका करणे आणि चुकीची माहिती देणे यात खूप फरक असतो. खेळाच्या बाबतीत चर्चा होत असेल तर ते स्वागतार्ह आहे. परंतु एखाद्या खोट्या अफवेमुळे खेळाडूचे भविष्य धोक्यात येत असेल तर ते चुकीचे आहे. त्यामुळे अशा प्रकारे रिपोर्टिंग करताना काळजी घ्यायला हवी, असे प्रीति झिंटा म्हणाली आहे.

अशा अफवांमुळे खेळ आणि खेळाडू अशा दोघांचेही नुकसान होते, असेही मत तिने व्यक्त केले. पंजाब किंग्स संघाच्या मॅनेजमेंटनेही याबाबत संताप व्यक्त केला आहे. सध्या आमच्या खेळाडूंबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. खोट्या कथा रचून त्या सगळीकडे पसरवणे हे खेळभावनेच्या विरोधात आहे, असे पंजाब किंग्जने म्हटले आहे.

Follow Us
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?