AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithvi Shaw: महिनाभरापूर्वी साखरपुडा मोडला, आता पुन्हा जुळले सूर; पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवालच्या लव्ह लाइफमध्ये नवा ट्विस्ट

Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल यांच्या प्रेमकहाणीत नवा अध्याय सुरू झाला आहे. त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

Prithvi Shaw: महिनाभरापूर्वी साखरपुडा मोडला, आता पुन्हा जुळले सूर; पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवालच्या लव्ह लाइफमध्ये नवा ट्विस्ट
| Updated on: Oct 12, 2026 | 10:03 PM
Share

बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघाबाहेर असलेला पृथ्वी शॉ पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या महिन्यात त्याची होणारी पत्नी आणि अभिनेत्री आकृती अग्रवालसोबतचा साखरपुडा मोडल्याची घोषणा केल्यानंतर आता या दोघांनी त्यांच्या नात्याला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आकृती अग्रवालने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने ते दोघं पुन्हा एकत्र आल्याचं सांगितलं आहे.

आकृती अग्रवालने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून जाहीर केले आहे की, त्यांच्यातील गैरसमज दूर झाले असून ते पुन्हा एकत्र आले आहेत. पृथ्वी आणि आकृती गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. यावर्षी ८ मार्च रोजी त्यांचा थाटामाटात साखरपुडा झाला होता, पण साखरपुड्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच त्यांनी गेल्या महिन्यात विभक्त झाल्याची घोषणा केली.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, आकृतीने तिच्या पूर्वीच्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. जेव्हा मी माझा साखरपुडा मोडला, तेव्हा मी माझ्या जवळच्या लोकांच्या मतांनी प्रभावित झाले, ज्यांना वाटत होते की ते आमच्या नात्याला माझ्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखतात. मला वाटते की माझी दिशाभूल झाली आणि आमच्यात व्हायला हवी असलेली प्रामाणिक चर्चा न करताच मी हा मोठा निर्णय घेतला.

आकृती अग्रवाल पुढे म्हणाली, “मी त्या निर्णयाची आणि त्यामुळे झालेल्या वेदनांची संपूर्ण जबाबदारी घेते.” आकृतीने स्पष्ट केले की, त्या दोघांमध्ये मनमोकळी चर्चा झाली, ते एकमेकांना समजून घेऊ शकले आणि त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सर्वांना त्यांच्या नव्या सुरुवातीचा आणि वैयक्तिक निर्णयाचा आदर करण्याचे आवाहनही केले.

आकृती अग्रवाल ही इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेली एक सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहे. ती अभिनय क्षेत्रातही कार्यरत असून, अनेक प्रोजेक्ट्स आणि डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. यामुळे ती नेहमी चर्चेत असते.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान