Virat Kohli: कॅप्टनशिपच्या स्वार्थापोटी विराट धोनीशी तोडणार होतं नातं! पेज नंबर 42 मधून गौप्यस्फोट

| Updated on: Jan 12, 2023 | 10:17 AM

Virat Kohli: ही घटना कधीची आहे? आणि हे पेज नंबर 42 काय आहे? विराट कधी कॅप्टनशिपसाठी इतका उतावीळ झालेला?

Virat Kohli: कॅप्टनशिपच्या स्वार्थापोटी विराट धोनीशी तोडणार होतं नातं! पेज नंबर 42 मधून गौप्यस्फोट
Ms dhoni-Virat Kohli
Image Credit source: AFP
Follow us on

Virat kohli-MS Dhoni:  सध्याच्या घडीला विराट कोहलीसाठी एमएस धोनी एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. विराट कोहली एमएस धोनीची स्तुती करताना थकत नाही. विराट एमएस धोनीला आपला आदर्श, मोठा भाऊ मानतो. विराट धोनीला इतका मान-सन्मान यासाठी देतो, कारण धोनीने कॅप्टन म्हणून विराटसाठी बरच काही केलय. विराटच्या करिअरला आकार देण्यात धोनीचा सुद्धा रोल आहे. आज विराट आणि धोनी खूप जवळ आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का? काही वर्षांपूर्वी हे नातं तुटणार होतं. हे आम्ही म्हणत नाहीय, एका पुस्तकातून हा खुलासा झालाय. टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांनी हे पुस्तक लिहिलय.

रवी शास्त्रींची मध्यस्थी

पुस्तकात म्हटलय त्यानुसार, 2016 सालची ही घटना आहे. त्यावेळी धोनी आणि विराटच नातं तुटीच्या उंबरठ्यावर होतं. रवी शास्त्रींमुळे हे घडलं नाही. त्यांनी विराटला समजावलं. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील हे अनमोल नातं अजूनही टिकून आहे.

‘पेज नंबर 42’ चं रहस्य

2016 साली आर. श्रीधर टीम इंडियाचे फील्डिंग कोच होते. त्यांनी ‘कोचिंग बियॉन्ड’ हे पुस्तक लिहिलय. या पुस्तकाच्या पान नंबर 42 वर हा धक्कादायक मजकूर आहे. विराट कोहलीने वनडे आणि टी 20 टीमच कॅप्टन बनण्याचा ध्यास घेतला होता. त्यामुळे धोनी सोबतच नातं बिघडण्याच्या स्थितीमध्ये होतं.

पुस्तकातला तो मजकूर काय आहे?

2016 साली विराट कोहली कॅप्टन बनण्यासाठी खूप उतावीळ झाला होता. विराट कोहली काही गोष्टी बोलून गेला. त्यातून व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याची त्याची इच्छा दिसून आली. एका संध्याकाळी रवी शास्त्रींनी विराटला फोन केला. त्यांनी विराटला सांगितलं की, “एमएसने टेस्ट कॅप्टनशिप तुला दिलीय. त्याचा आदर कर. मर्यादीत ओव्हर्समध्येही तो, तुला कॅप्टनशिप देईल. पण योग्यवेळ येईपर्यंत थांब. तू धोनीचा आदर राखला नाहीस, तर उद्या तू कॅप्टन झाल्यावर, तुलाही तुझ्या टीममध्ये सन्मान मिळणार नाही. कॅप्टनशिप तुझ्याकडे येईल. पण त्यासाठी तू कॅप्टनशिपच्या मागे पळू नको”

धोनीने वनडेमध्ये कधी कॅप्टनशिप सोडली?

2017 मध्ये एमएस धोनीने लिमिटेड ओव्हर्समध्ये कॅप्टनशिप सोडली. त्यावेळी विराट कोहली टीम इंडियचा ऑल फॉर्मेटमध्ये कॅप्टन बनला.