‘लोक माझ्या नावावर साधा विश्वास ठेवत नव्हते’, द्रविड की, डेविड, हेड कोच राहुल यांचा खुलासा

राहुल द्रविड (Rahul Dravid) की, राहुल डेविड भारतीय कोचने आपल्या नावाबद्दल खूपच इंटरेस्टिंग खुलासा केला आहे. भारताचे हेड कोच राहुल द्रविड ऑलिम्पिंक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव ब्रिंदाच्या (Abhinav Bindra) 'इन द झोन पॉडकास्ट' मध्ये सहभागी झाले होते.

लोक माझ्या नावावर साधा विश्वास ठेवत नव्हते, द्रविड की, डेविड, हेड कोच राहुल यांचा खुलासा
Rahul dravid
Image Credit source: AFP
| Updated on: Jul 26, 2022 | 10:40 AM

नवी दिल्ली: राहुल द्रविड (Rahul Dravid) की, राहुल डेविड भारतीय कोचने आपल्या नावाबद्दल खूपच इंटरेस्टिंग खुलासा केला आहे. भारताचे हेड कोच राहुल द्रविड ऑलिम्पिंक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव ब्रिंदाच्या (Abhinav Bindra) ‘इन द झोन पॉडकास्ट’ मध्ये सहभागी झाले होते. जिथे त्यांनी त्यांच्या शालेय जीवनाबद्दलचा एक किस्सा शेयर केला. कदाचितच आधी कोणाला हा किस्सा माहित असेल. शालेय क्रिकेट (School Cricket) मध्ये पहिलं शतक झळकावल्यानंतर वृत्तपत्रात छापून आलेल्या नावाबद्दल बिंद्रा यांनी राहुल द्रविड यांना प्रश्न विचारला.

ते माझ्या नावावरही विश्वास ठेवत नव्हते

वृत्तपत्रात राहुल द्रविड यांचं नाव चुकून राहुल डेविड म्हणून प्रसिद्ध झालं होतं. “एडिटरला वाटलं असेल, द्रविड नावाचं कोणी नसेल, कदाचित स्पेलिंग मधली ही एक चूक आहे. द्रविड नाही डेविड असेल. तो माझ्यासाठी एक चांगला धडा होता. शालेय क्रिकेट मध्ये शतक झळकावल्यामुळे मी आनंदात होतो, उत्साहित होतो. पण लोक मला ओळखत नव्हते. लोकांना साधं माझ नावही माहित नव्हतं. ते माझ्या नावावरही विश्वास ठेवत नव्हते, त्यांनी नाव बदललं होतं” असं द्रविड म्हणाले.

बिंद्राकडून कशी प्रेरणा घेतली?

ऑलिम्पिक मध्ये अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर त्याच्याकडून कशी प्रेरणा घेतली? ते राहुल द्रविड यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं. “2008 मध्ये माझी खराब फॉर्मशी झुंज सुरु होती. धावा होत नव्हत्या. मला माझ्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज होती. माझ्या मध्ये काही वर्षांचं क्रिकेट बाकी आहे, हे मला माहित होतं. त्यावेळी बीजिंग मध्ये अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल कसं जिंकलं ते मी पाहिलं. त्याच्या विजयातून मला प्रेरणा मिळाली. अभिनव ब्रिंदाची ऑटोबायोग्राफी वाचणं खूप सुंदर अनुभव होता. ज्यांना सर्वोत्तम कामगिरी करायची आहे, त्यांनी ही कथा वाचली पाहिजे” असं द्रविड म्हणाले. राहुल द्रविड सध्या वेस्ट इंडिज मध्ये आहेत. तिथे टीम इंडियाची तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. भारताने 2-0 ने या सीरीज मध्ये विजयी आघाडी घेतली आहे. वनडे सीरीज संपल्यानंतर टी 20 मालिका सुरु होणार आहे.