षटकारांचा पाऊस, एका षटकात 5 षटकार, पाहा VIDEO

आपल्या धडाकेबाज फलंदाजीने भुरळ घालणाऱ्या या फलंदाजाचं नाव नसरुतुल्ला सुलतान आहे. आणि ज्या स्पर्धेत सुलतानचा दणका दिसून आला आहे ती म्हणजे युरोपियन चॅम्पियनशिप. नेमकं काय झालं, वाचा...

षटकारांचा पाऊस, एका षटकात 5 षटकार, पाहा VIDEO
षटकारांचा पाऊस
Image Credit source: social
| Updated on: Sep 21, 2022 | 11:48 PM

नवी दिल्ली :  सामना स्वीडन आणि नेदरलँड (Nederland) इलेव्हन यांच्यात होता. या सामन्यात सुलतान स्वीडनकडून खेळत होता. संघाची सलामीची जोडी 6.4 षटकात 64 धावांच्या स्कोअरवर तुटली तेव्हा सुलताननं आघाडी घेत नेदरलँड इलेव्हनच्या गोलंदाजांवर अशाप्रकारे हल्ला चढवला की सगळेच थक्क झाले. स्वीडनच्या सुलतानने (Nusratullah Sultan) 9व्या षटकात प्रतिस्पर्ध्यांवर जोरदार हल्ला चढवला. त्यानं या षटकात 5 षटकार ठोकले आणि ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे.

ही व्हिडीओ पाहा

हा हल्ला 36 वर्षीय फलंदाजाने सेबॅस्टियन ब्रॅट नावाच्या गोलंदाजाविरुद्ध केला होता. या षटकात सुलतानने षटकार मारण्यास सुरुवात केली तेव्हा स्वीडनची धावसंख्या 1 गडी बाद 79 अशी होती आणि जेव्हा 5 षटकारांचा कार्यक्रम संपला तेव्हा हीच धावसंख्या 1 बाद 103 धावांवर पोहोचली.

307.12 चा स्ट्राईक रेट

उजव्या हाताचा फलंदाज सुलताननं त्याच्या डावात एकूण 14 चेंडू खेळले, ज्यामध्ये त्याने 307.12 च्या स्ट्राइक रेटनं 43 धावा केल्या. त्याच्या संपूर्ण खेळीत 7 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. म्हणजेच या 7 षटकारांपैकी त्याने केवळ 1 षटकात 5 षटकार लगावले. सुलतानच्या या खेळीमुळे त्याच्या संघानं 10 षटकांत 2 बाद 119 धावा केल्या. पण, त्याच्या संघाच्या गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. नेदरलँड इलेव्हनने हा सामना 8 षटकांत जिंकला.