RCB vs GT Final : कॅप्टन रजत पाटीदार याची ऐतिहासिक कामगिरी, धोनी-रोहितच्या विक्रमाची बरोबरी

Rajat Patidar IPL 2026 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे. रजत पाटीदार याने यासह कॅप्टन म्हणून आयपीएल स्पर्धेत ऐतिहासिक अशी कामगिरी करुन दाखवली आहे. जाणून घ्या.

RCB vs GT Final : कॅप्टन रजत पाटीदार याची ऐतिहासिक कामगिरी, धोनी-रोहितच्या विक्रमाची बरोबरी
Rajat Patidar Virat Kohli Rcb IPL 2026
Image Credit source: IPL X Account
| Updated on: Jun 01, 2026 | 1:42 AM

विराट कोहली याने विजयी षटकार ठोकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध दमदार विजय मिळवून दिला आहे. आरसीबीला 156 धावांचा पाठलाग करताना विजयासाठी 1 धावेची गरज होती. तेव्हा विराटने 18 व्या ओव्हरमधील अर्शद खान याने टाकलेल्या शेवटच्या बॉलवर सिक्स लगावला आणि आरसीबीला विजयी केलं. आरसीबीने यासह यशस्वीरित्या आपल्याकडे ट्रॉफी कायम राखली. तसेच आरसीबीने अशाप्रकारे सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली. आरसीबी यासह सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन हा बहुमान मिळवणारी तिसरी टीम ठरली. आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात ही कामगिरी करुन दाखवली. यासह रजत पाटीदार याने 2 दिग्गज कर्णधारांच्या विक्रमाची बरोबरी केली.

रजतकडून धोनी-रोहितच्या विक्रमाची बरोबरी

रजत पाटीदार आपल्या नेतृत्वात टीमला सलग 2 आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा कर्णधार ठरला आहे. रजतने यासह महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा या कर्णधारांच्या विक्रमाची बरोबरी केली. आरसीबीने गेल्या मोसमातील(IPL 2025) अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील पंजाब किंग्सला पराभूत करुन पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. रजत पाटीदार याने त्याच्या कॅप्टन्सीत आरसीबीचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं. त्यानंतर आता रजतने आपल्या कॅप्टन्सीत ट्रॉफी कायम राखली आहे.

महेंद्रसिंह धोनी याने स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा त्याच्या नेतृत्वात सलग 2 ट्रॉफी जिंकून देण्याची कामगिरी केली होती. धोनीने चेन्नई सुपर किंग्सला 2010 आणि 2011 या सलग 2 हंगामांमध्ये विजयी केलं होतं. त्यानंतर तब्बल 9 वर्षांनी रोहित शर्मा याने महेंद्रसिंह धोनी याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. रोहितने कॅप्टन म्हणून मुंबई इंडियन्सला 2019 आणि 2020 साली आयपीएल चॅम्पियन केलं होतं. त्यानंतर आता या मानाच्या यादीत रजत पाटीदार याने स्थान मिळवलं आहे.

कॅप्टन रजत पाटीदारची खास कामगिरी

रजतने 19 व्या हंगामात किती धावा?

दरम्यान रजत पाटीदार याने या हंगामात नेतृत्वासह फलंदाज म्हणूनही आपली भूमिका चोखपणे पार पाडली. रजतने 19 व्या मोसमात 500 पेक्षा अधिक धावा केल्या. रजतने 15 सामन्यांत 260 बॉलमध्ये 501 रन्स केल्या. रजतने या दरम्यान 41.75 च्या सरासरीने आणि 192.69 या स्ट्राईक रेटने ही कामगिरी केली. रजतने 19 व्या मोसमात 5 अर्धशतकं लगावली. नाबाद 93 ही रजतची सर्वोत्तम खेळी ठरली.

Follow Us