
राजकोट | सौरभ कुमार याच्या फिरकीच्या जोरावर रेस्ट ऑफ इंडियाने सौराष्ट्रला दुसऱ्या डावात 79 धावांवर गुंडाळलं. रेस्ट ऑफ इंडियाने यासह तिसऱ्या दिवशी 175 धावांच्या फरकाने सामना जिंकला. रेस्ट ऑफ इंडियाने यासह इराणी कप उंचावला. रेस्ट ऑफ इंडियाने पहिल्या डावात 94 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात 160 धावा केल्या. रेस्ट ऑफ इंडियाने अशाप्रकारे सौराष्ट्रसमोर इराणी कप जिंकण्यासाठी 255 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र सौराष्ट्र टीममधील चेतेश्वर पुजारा आणि शेल्डन जॅकसनसह सर्व फलंदाज अपयशी ठरले. रेस्ट ऑफ इंडियाच्या बॉलिंगसमोर सौराष्ट्रचं 34.3 ओव्हरमध्ये 79 धावांवर पॅकअप झालं.
सौराष्ट्रकडून दुसऱ्या डावात फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. दोघे आले तसेच झिरोवर आऊट होऊन गेले. चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. धर्मेंदसिंह जडेजा याने सर्वाधिक 21 धावा केल्या. तर अनुभवी चेतेश्वर पुजारा 7 धावांवर आऊट झाला. तर रेस्ट ऑफ इंडियाकडून सौरभ कुमार याने 43 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेतल्या. तर शम्स मुलानी याने 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली. पुलकित नारंग याच्या खात्यात 1 विकेट गेली.
रेस्ट ऑफ इंडियाने पहिल्या डावात 308 धावा केल्या. सौराष्ट्र 308 धावांचा पाठलाग करताना 214 रन्सवर फुस्स झाली. रेस्ट ऑफ इंडियाला पहिल्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली. रेस्ट ऑफ इंडियाने या आघाडीच्या जोरावर ऑलआऊट 160 धावा केल्या. रेस्ट ऑफ इंडियाने शेवटच्या 9 विकेट्स अवघ्या 43 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. रेस्ट ऑफ इंडियाकडून दुसऱ्या डावात मयंक अग्रवाल याने 49 धावा केल्या.तर साई सुदर्शन याने 43 रन्स केल्या. सौराष्ट्रकडून पार्थ भूत याने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तर धर्मेंद जडेजा याने 3 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
रेस्ट ऑफ इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हनुमा विहारी (कर्णधार), मयंक अग्रवाल, यश धुल, साई सुदर्शन, सरफराज खान, श्रीकर भरत (विकेटकीपर), शम्स मुलानी, सौरभ कुमार, पुलकित नारंग, नवदीप सैनी आणि विद्वत कवेरप्पा.
सौराष्ट्र प्लेईंग ईलेव्हन | जयदेव उनाडकट (कॅप्टन), हार्विक देसाई (विकेटकीपर), चेतेश्वर पुजारा, चिराग जानी, अर्पित वसावडा, शेल्डन जॅक्सन, प्रेरक मंकड, समर्थ व्यास, धर्मेंद्रसिंह जडेजा, पार्थ भुत आणि युवराजसिंह डोडिया.