AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समाधानी नसलो तरी… ठाण्यातील युती संदर्भात भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

"अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कमळ नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये फुललेली आहेत. त्याचीच पुनरावृत्ती महानगरपालिका निवडणुकीत दिसणार. कमल खिलेगा निश्चित रूप से. ठाण्यात महायुतीचा महापौर बसेल" असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला

समाधानी नसलो तरी... ठाण्यातील युती संदर्भात भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य
BJP Flag
| Edited By: | Updated on: Dec 31, 2025 | 1:38 PM
Share

“समाधानी नसलो तरी देखील व्यापक हित बघावे लागते. व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी युती केली आहे. मुंबईला युती झाली, ठाण्यात देखील झाली. व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही ठाण्यामध्ये युती केली आहे. समाधानी नसलो तरी युती धर्म म्हणून प्रत्येक कार्यकर्ता संघटना म्हणून काम करणार” असं ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर म्हणाले. “खूप वेळा युती झाली नाही. कल्याण-डोंबिवली या ठिकाणी देखील युती न करता भाजप पक्ष लढला होता. त्यावेळेस जिल्हाप्रमुख आनंद दिघे होते. मी या ठिकाणी ठाणे जिल्हा प्रमुख होतो आणि भारतीय जनता पार्टीचा अडीच वर्षासाठी महापौर झाला होता. युती झाली आहे. एकत्र येऊन भगवा फडकवणार” असं संजय केळकर म्हणाले.

“केंद्र आणि राज्यात आमचे दोन इंजिन चालू आहे. तिसरं इंजिन देखील इथे असलं पाहिजे. आम्ही पक्ष नेत्यांमुळे या ठिकाणी युती केली आहे. या ठिकाणी भगवा झेंडा फडकला पाहिजे ही आमची भूमिका आहे” असं संजय केळकर यांनी सांगितलं. “सर्व जागा आम्ही लढलो असतो. तशी आमची तयारी आमचे फॉर्म आले होते. कार्यकर्त्यांनी आठ वर्षे काम केले आहे. त्याच्यामुळे लोकांचा आशीर्वाद घेऊन असं काही नाही महापौर बसला नसता, महापौर बसला असता. परंतु आताच्या युतीच्या राजकारणात महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढणार. संदर्भ बदलले असले तरी जनता जनार्दन का आशीर्वाद देणार त्याच्याप्रमाणे 100 प्लस अधिक जागा येणार” असा विश्वास संजय केळकर यांनी व्यक्त केला.

कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याबद्दल मला माहिती नाही

“कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याबद्दल मला माहिती नाही. मात्र सर्वसमावेश लोक प्रांतामध्ये राहत आहेत. सबका साथ सबका विकास हे मोदींनी सांगितले आहे. कृपा जी काय बोलले ते मला माहिती नाही” असं संजय केळकर म्हणाले. “ठाणेकरांसाठी जे काय करता येईल ते आम्ही मुद्दे मांडत असतो. वाहतूक कोंडी, पाणी समस्या, इंटरनल मेट्रो अशा अनेक गरजेनुसार मुद्दा आम्ही उचलला. हॅपिनेससाठी मी झटून काम करणार” असं संजय केळकर म्हणाले.

मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल.
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने.
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन...
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.