AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून गाशा गुंडाळताच अफगाणिस्तानने कोच बदलला, आता रिचर्ड पायबस यांची नियुक्ती

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अफगाणिस्तानची कामगिरी निराशाजनक राहिली. अफगाणिस्तानने मागच्या पर्वात उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. मात्र यंदा साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना अफगाणिस्तानने मुख्य प्रशिक्षक बदलला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून गाशा गुंडाळताच अफगाणिस्तानने कोच बदलला, आता रिचर्ड पायबस यांची नियुक्ती
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून गाशा गुंडाळताच अफगाणिस्तान कोच बदलला, आता रिचर्ड पायबस यांची नियुक्तीImage Credit source: Afghanistan Cricket X
| Updated on: Feb 24, 2026 | 10:04 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानला गाशा साखळी फेरीतच गुंडाळावा लागला. या स्पर्धेत काही उलटफेर करण्याची अपेक्षा होती. मात्र तसं काही घडलं नाही. साखळी फेरीत चार पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आणि दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे पदरात 4 गुण पडले. पण सुपर 8 फेरीचं गणित काही जुळवता आलं नाही. त्यामुळे साखळी फेरीतूनच संघ घरी परतला आहे. यासह मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांचा कार्यकाळही संपला. त्यानतंर अफगाणिस्तानने मंगळवारी रिचर्ड पायबस यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. 61 वर्षीय पायबस यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रतिष्ठित प्रशिक्षक म्हणून कारकिर्द आहे. त्यांनी यापूर्वी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या प्रशिक्षकपदाची भूमिका बजावली आहे.

पुढच्या महिन्यात अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात व्हाईट बॉल क्रिकेट मालिका सुरू होईल त्या आधीच पायबस हे अफगाणिस्तान संघासोबत काम करण्यास सुरूवात करतील. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने माहिती देताना सांगितलं की, ‘पायबस यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ जबरदस्त राहिला आहे. त्यांनी 2013 ते 2019 या कालावधीत वेस्ट इंडिज संघासोबत काम केलं आहे. या काळात त्यांनी वेस्ट इंडिज संघ बांधणीत मोलाचं सहकार्य केलं. त्यांच्या कार्यकाळात वेस्ट इंडिजने 2016 आयसीसी वर्ल्डकप जिंकला. याच वेस्ट इंडिजच्या पुरूष, महिला आणि अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील जेतेपद जिंकली. एकाच वर्षात तीन जेतेपद मिळवून ऐतिहासिक नोंद झाली होती. ‘

‘मागच्या काळात पायबस यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1999 मध्ये पाकिस्तानने वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबतही काम केलं हे. 2013 साली त्यांनी वरिष्ठ मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. इतकंच काय देशांतर्गत पातळीवरही त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. दक्षिण अफ्रिकेच्या देशांतर्गत पातळीवर आणि फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणून भूमिका पार पाडली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाने जेतेपद मिळवलं होतं. त्यांना दोनदा दक्षिण आफ्रिकेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेट प्रशिक्षक म्हणून गौरविण्यात आले. ‘ असंही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...