Rishabh Pant Accident : अपघातानंतर ऋषभ पंतच्या सामानाची लोकांकडून लूट?, नेमकं काय घडलं?; पोलिसांनी सांगितली खरं काय!

| Updated on: Dec 31, 2022 | 7:51 AM

आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी ऋषभ स्वत: कार चालवून रुडकीला जात होता. त्याचवेळी त्याचा अपघात झाला. शुक्रवारी पहाटे 5 वाजून 22 मिनिटाने त्याचा अपघात झाला.

Rishabh Pant Accident : अपघातानंतर ऋषभ पंतच्या सामानाची लोकांकडून लूट?, नेमकं काय घडलं?; पोलिसांनी सांगितली खरं काय!
अपघातानंतर ऋषभ पंतच्या सामानाची लोकांकडून लूट?, नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: टीम इंडियाचा विकेटकिपर ऋषभ पंतचा काल उत्तराखंडच्या रुडकी येथे भीषण अपघात झाला. या अपघातात त्याची कार जळून खाक झाली. नशिब बलवत्तर म्हणून तो बचावला. या अपघातात प्रचंड मार लागल्याने त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या अपघातानंतर ऋषभच्या सामानाची नागरिकांनी लूट केल्याचं वृत्त आहे. त्यावर आता पोलिसांनीच खुलासा केला आहे.

ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं आहे. काही लोक तर सोशल मीडियावरून चुकीचे आणि दिशाभूल करणारे मेसेज व्हायरल करत आहेत. ऋषभ पंतचा अपघात झाल्यांतर त्याचं सामान अज्ञात व्यक्तिंनी लुटलं आहे. लोकांनी त्याला मदत करण्याऐवजी त्याच्या सामानाची पळवापळवी केली आहे.

हे सुद्धा वाचा

या अफवांवर हरिद्वार पोलिसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हरिद्वार पोलीस दलातील एसपी अजय सिंह यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. अपघातानंतर ऋषभच्या सामानाची लूट करण्यात आल्याचं वृत्त काही वाहिन्या आणि पोर्टलनी दिलं आहे. त्यात तथ्य नाही. हे वृत्त चुकीचं आहे, असं अजय सिंह यांनी म्हटलं आहे.

अपघातानंतर पोलीस स्वत: घटनास्थळी गेले. यावेळी पोलिसांनी लोकांची विचारपूस केली. त्यांच्याकडून माहिती घेतली. प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदवली. त्यावरून लुटीची घटना घडलीच नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

ऋषभ पंतवर रुडकीतच प्राथमिक उपचार करणअयात आले होते. त्यावेळी त्याने त्याच्याकडील एका बॅगेशिवाय सर्व सामाव गाडीत जळून खाक झालं असल्याचं सांगितलं.

हरिद्वार पोलिसांनी घटनास्थळावरून सुटकेस, रोकड, ब्रेसलेट आणि सोन्याची चेन जप्त केली. या सर्व गोष्टी त्यांनी ऋषभच्या आईकडे दिल्या आहेत.

आपल्या आईला सरप्राईज देण्यासाठी ऋषभ स्वत: कार चालवून रुडकीला जात होता. त्याचवेळी त्याचा अपघात झाला. शुक्रवारी पहाटे 5 वाजून 22 मिनिटाने त्याचा अपघात झाला. दिल्ली-डेहराडून रोडवर डिव्हाडरला धडक दिल्याने त्याची कार पलटी झाली आणि कारला आग लागल्याचं पोलिसांनी सांगितलं.