Rishabh Pant Health update: ऋषभला आरामच मिळत नाहीय, हॉस्पिटलमध्ये नेमकी समस्या काय?

Rishabh Pant Health update: रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभला ICU मधून प्रायव्हेट वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलय.

Rishabh Pant Health update: ऋषभला आरामच मिळत नाहीय, हॉस्पिटलमध्ये नेमकी समस्या काय?
अपघातानंतर ऋषभ पंतच्या सामानाची लोकांकडून लूट?, नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 02, 2023 | 11:25 AM

डेहराडून: टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. शुक्रवारी सकाळी त्याच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ गंभीर जखमी झाला आहे. ऋषभला खरंतर आरामची गरज आहे. पण त्याला भेटणाऱ्यांची रांग लागली आहे. ऋषभला भेटण्यासाठी सतत लोक येत आहेत. त्यामुळे त्याला व्यवस्थित आराम मिळत नाहीय. पंतच्या कुटुंबाने याबद्दल चिंता व्यक्त केलीय. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच म्हणण काय?

“ऋषभला पूर्ण आराम मिळणं गरजेच आहे. फिजकल आणि मानसिक अशी दोन्ही प्रकारची विश्रांती आवश्यक आहे. अपघातात पंत जखमी झाला आहे. त्याच्या वेदना अजूनही कायम आहेत. भेटायला येणाऱ्या लोकांबरोबर पंत जेव्हा बोलतो, त्यात त्याची ऊर्जा वाया जाते. ही ऊर्जा वाचली, तर तो चांगला रिकव्हर होईल. जे पंतला भेटण्यासाठी येण्याचा विचार करतायत, त्यांनी आपला निर्णय बदलावा. त्याला आरामाची गरज आहे” असं पंतवर उपचार करणाऱ्या मेडीकल टीममधील सदस्यांनी सांगितलं.


हायप्रोफाईल पेशंट

मॅक्स हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान विजिटर येऊ शकतात. रुगणालयाच्या स्टाफनुसार, ऋषभ पंत हायप्रोफाइल रुग्ण आहे. त्यामुळे त्याला भेटायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे समस्या निर्माण होतेय.

ICU मधून प्रायवेट वॉर्डमध्ये हलवलं

बॉलिवूड कलाकार अनिल कपूर, अनुपम खेर हे ऋषभला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. क्रिकेटपटू नीतिश राणा सुद्धा आपल्या कुटुंबासोबत पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात आला होता. त्याशिवाय डायरेक्टर श्याम शर्मा यांच्या नेतृत्वाखाली DDCA च्या टीमने पंतची भेट घेतली. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभला रविवारी ICU मधून प्रायवेट वॉर्डमध्ये हलवण्यात आलय.