‘रोहित शर्माकडून टी 20 ची कॅप्टनशिप काढून घेऊ शकतात’

| Updated on: Jun 27, 2022 | 4:51 PM

सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचा कर्णधार आहे. पण लवकरच त्याला टी 20 कॅप्टनशिपच्या जबाबदारीतून मुक्त केलं जाऊ शकतं.

रोहित शर्माकडून टी 20 ची कॅप्टनशिप काढून घेऊ शकतात
Rohit Sharma
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: सध्या रोहित शर्मा (Rohit Sharma) क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचा कर्णधार आहे. पण लवकरच त्याला टी 20 कॅप्टनशिपच्या जबाबदारीतून मुक्त केलं जाऊ शकतं, असं मत भारताची माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने व्यक्त केलं आहे. 35 वर्षीय रोहित शर्माला चांगल्या पद्धतीने त्याचा वर्कलोड मॅनेज करता यावा, यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सेहवागने म्हटलं आहे. कॅप्टन झाल्यापासून रोहित शर्मा भारतासाठी सर्वच सामन्यांमध्ये खेळताना दिसलेला नाही. याचं कारण आहे दुखापती आणि वर्कलोड मॅनेजमेंट. (Workload Management) “टी 20 फॉर्मेट मध्ये दुसरा एखादा खेळाडू कॅप्टन म्हणून टीम मॅनेजमेंटच्या डोक्यात असेल, तर रोहित शर्माला टी 20 च्या जबाबदारी मुक्त केलं जाऊ शकतं” असं सेहवाग पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

तर रोहितला ब्रेक घेता येईल

“एखाद्या नवीन खेळाडूला टी 20 चं कॅप्टन बनवलं, तर रोहितला ब्रेक घेता येईल तसंच टेस्ट आणि वनडे मध्ये नव्या दमांन नेतृत्व करण्याचा उत्साह असेल” असं सोनी स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सेहवाग म्हणाला. भारत-इंग्लंड मालिकेचे ते अधिकृत प्रसारक आहेत.

 तर रोहित शर्माच सर्वोत्तम पर्याय

“तिन्ही फॉर्मेटमध्ये एकच कॅप्टन हवा, या सध्याच्या धोरणावर संघ व्यवस्थापन कायम राहिलं, तर रोहित शर्माच सर्वोत्तम पर्याय आहे” असे सेहवगाने म्हटलं.

हे सुद्धा वाचा

टॉप ऑर्डरसाठी तिघांना पसंती

“टी 20 मध्ये हार्ड हिटर्सचा विषय येतो, तेव्हा टीम इंडियाकडे अनेक पर्याय आहेत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ंड कपमध्ये टॉप ऑर्डरमध्ये माझी पसंती रोहित शर्मा, इशान किशन आणि केएल राहुल आहे” असं त्याने सांगितलं. “रायटी आणि लेफ्टी या कॉम्बिनेशचा विचार केल्यास, रोहित शर्मा-इशान किशन किंवा इशान-केएल राहुलची जोडी सुद्धा चांगली ठरु शकते” असं वीरेंद्र सेहवागने सांगितलं.

उमरानच विशेष कौतुक

वीरेंद्र सेहवागने भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचही कौतुक केलं. 22 वर्षाचा उमरान मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहसह वर्ल्ड कपच्या टीममध्ये दिसेल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.