Rohit Sharma: रोहित शर्माने पुन्हा केली तीच चूक, एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

IND vs SA: रांची वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. आता दोन्ही दिग्गज खेळाडू टीम इंडियासोबत रायपूरला पोहोचले आहे. असं असताना या दरम्यान एक मजेशीर किस्सा घडला. व्हिडीओ पाहून आणि बातमी वाचून तुम्हीही हसाल.

Rohit Sharma: रोहित शर्माने पुन्हा केली तीच चूक, एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल
Rohit Sharma: रोहित शर्माने पुन्हा केली तीच चूक, एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 01, 2025 | 6:28 PM

रोहित शर्माने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळत क्रीडाप्रेमींना खूश केलं. ऑस्ट्रेलियातील शतकी खेळीनंतर रोहितने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध अर्धशतक ठोकलं आणि संघाताली दावा आणखी घट्ट केला. त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 51 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत 57 धावांची खेळी केली. तसेच विराट कोहलीसोबत 109 चेंडूत 136 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माचा फॉर्म पाहून क्रीडाप्रेमींन आनंद द्विगुणित झाला आहे. दुसरीकडे, रोहित शर्माची जुनी सवय काय मोडत नाही. त्याच्या सवयीमुळे टीम इंडिया, त्याची पत्नी आणि त्यांच्या मित्रांना नाहक त्रासाला सामोरं जावं लगत आहे. त्याची ही सवय म्हणजे विसरभोळेपणा.. नाणेफेकीवेळी असो की हॉटेलमध्ये प्रत्येक ठिकाणी रोहित शर्माने आपल्या विसरभोळेपणाच्या खुणा उमटवल्या आहेत. आता रांचीत पुन्हा एकदा त्याचा विसरभोळेपणा अधोरेखित झाला आहे. यावेळी काय विसरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे.

रोहित शर्मा यावेळी काय विसरला?

रोहित शर्माने रांचीत काय केलं ते वाचून आणि त्याचा व्हिडीओ पाहून तु्म्हाला हसू आवरणार नाही. रोहित शर्मा जेव्हा रांची हॉटेलमधून एअरपोर्टवर पोहोचला तेव्हा बसमध्ये तो एअरपॉड विसरला होता. रोहित शर्मा एअरपोर्टवर वेटिंग रूममध्ये बसला होता. त्याला त्याची कल्पनाही नव्हती आपण काय विसरलो आहोत. यानंतर टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफमधील एक व्यक्ती तिथे आला आणि त्याला एअरपॉड केस दिलं. रोहित शर्माने एअरपॉड पाहताच मिश्किल हसला आणि सपोर्ट स्टाफचे धन्यवाद दिले.

रोहित शर्माच्या विसरभोळेपणाबाबत त्याच्या संघ सहकाऱ्यांनी अनेकदा सांगितलं आहे. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी त्याच्या या सवयीबाबत मुलाखतीत जाहीररित्या सांगितलं आहे. रोहित शर्मा कधी पासपोर्ट, कधी सूटकेस विसरतो. तर कधी मोबाईल आणि एअरपॉडही विसरतो. एकदा तर वेडिंग रिंगही विसरला होता. हे त्याने स्वत: एका मुलाखतीत सांगितलं आहे. पण रोहित शर्माला फलंदाजी करताना सर्वकाही आठवतं हेही तितकंच खरं आहे. रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांना विक्रम मोडला आहे.