AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित बनला प्रँकस्टार, पत्नी रितीकासोबत केलेला हा प्रँक पाहाच!

रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. दोघांचेही सोशल मीडियावर अनेक चाहते असून त्यांच्या पोस्टला भरभरुन प्रतिसाद मिळत असतो.

VIDEO: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित बनला प्रँकस्टार, पत्नी रितीकासोबत केलेला हा प्रँक पाहाच!
रोहितने पत्नी रितीकासोबत केला प्रँक
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 7:51 PM
Share

मुंबई : आयपीएलचं यंदाचं पर्व हळूहळू अंतिम सामन्याच्या दिशेने जात आहे. प्लेऑफमध्ये दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू हे संघ गेले असून तिसऱ्या स्थानासाठी हैद्राबाद सोडता इतर संघामध्ये चुरस आहे. यामध्ये शर्यतीत मुंबई इंडियन्सचा संघही आहे. दरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र सध्या सामन्यापूर्वीचा ताण हलका करण्यासाठी फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे.

रोहितने पत्नी रितिकासोबत (Ritika Sajdeh)  एक प्रँक करतानाचा व्हिडीओ स्वत:च शूट केला असून त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्टही केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित एक चॉक्लेट त्याच्या मुठीत बंद करुन अचानक रितीकासमोर येतो. तो तिला मुठीत काय आहे? ते पाहायला सांगतो. पण रोहितच्या खोडकर वृत्तीमुळे दचकलेली रितीका सुरुवातीला भितीपोटी मुठीला हात लावत नाही. अखेर रोहितच्या म्हणण्यावर ती मुठीला स्पर्श करताच रोहित मुठी खोलतो त्यावेळी त्यात चॉक्लेट पाहून रितीकाही आनंदी होते. दरम्यान या व्हिडीओला रोहितच्या चाहत्यांनी खूप लाईक केले असून मुंबई इंडियन्स संघाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन रोहितला प्रँकस्टार अशी पदवी देणारी कमेंच करण्यात आली आहे.

रितिका रोहित 2015 साली लग्नाच्या बेडीत

रितिका-रोहित 2015 साली लग्नाच्या बेडीत अडकले. रोहतची पहिली गर्लफ्रेंड सोफिया हयातबरोबरच्या ब्रेकअप नंतर रोहितची रितिका बरोबर ओळख झाली. पुढे खूप चांगली मैत्री होऊन त्या मैत्रीचं रुपांर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी 2015 साली लग्न केलं. ज्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. समायरा ही रोहित-रितिकाची क्युट मुलगी आहे. अनेक मॅचेसला रितिका समायराला घेऊन मैदानावर उपस्थिती लावत असते.

प्लेऑफसाठी मुंबई इंडियन्सचा मार्ग खडतर

यंदाच्या आयपीएलचा विचार करता मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आता त्यांच्या दमदार कामगिरीवर अवलंबून असेल. कारण रोहित शर्माच्या या टीमला आता फक्त जिंकणेच नाही तर त्यांचा नेट रन रेटही वाढवायचा आहे. संघाला पुढील दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याशी खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने सोपे होणार नाहीत कारण सनरायझर्सकडे गमावण्यासारखे काहीच नाही आणि राजस्थान रॉयल्स स्वतः प्लेऑफच्या शर्यतीसाठी मोठा दावेदार आहे.

मुंबई इंडियन्सचे उर्वरीत सामने

– 05 ऑक्टोबर (मंगळवार): मुंबई vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): मुंबई vs सनरायजर्स हैद्राबाद, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

इतर बातम्या

KKR vs SRH : सलामीच्या सामन्यातच उम्रान मलिकची कमाल, नावे केला गोलंदाजीचा जबरदस्त रेकॉर्ड, पाहा VIDEO

IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट

RCB vs PBKS: पंचाचा चूकीचा निर्णय, राहुल भडकला, दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो पंचाला तात्काळ बडतर्फ करा, वाचा नेमकं प्रकरण काय?

(Rohit Sharma Prank with wife Ritika Sajdeh posted on instagram see video)

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती