Rohit sharma : कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, विराट कोहलीबाबत रोहित म्हणाला…

| Updated on: Dec 09, 2021 | 4:14 PM

टीम इंडियाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा एका मुलाखतीत विराटबद्दल म्हणाला, विराट कोहलीचं टीमधील योगदान अतिशय उत्तम आहे. त्याच्यासरख्या खेळाडुंची टीमला गरज आहे.

Rohit sharma : कॅप्टन झाल्यानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, विराट कोहलीबाबत रोहित म्हणाला...
भारतीय संघ
Follow us on

मुंबई : विराट कोहलीला टीम इंडियाचं कर्णधारपद गमवावे लागले आहे. आता टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या हाती देण्यात आली आहे. आयपीएलमधील रोहितची शानदार कामगिरी, तसेच व्हाईट बॉल क्रिकेटमधील जबरदस्त रेकॉर्ड, यामुळे कर्णधारपदी रोहितची निवड करण्यात आली आहे. आता टी-20 आणि वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे, तर केवळ टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली असणार आहे. त्यामुळे टीमला आता नवे नेतृत्व मिळाले आहे.

रोहित विराटबद्दल म्हणाला…

टीम इंडियाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा एका मुलाखतीत विराटबद्दल म्हणाला, विराट कोहलीचं टीमधील योगदान अतिशय उत्तम आहे. त्याच्यासरख्या खेळाडुंची टीमला गरज आहे. विराट कोहलीने आतापर्यंत शानदार खेळी करत अनेकदा टीमला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे अशा खेळाडुंचा टीममधील भरणा टीमला आणखी मजबूत बनवतो.

विराट अजूनही टीमचा लीडर

विराट कोहलीबद्दल आणखी बोलताना रोहित म्हणाला, विराट कोहली अजूनही टीमचा लीडर आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाची परदेशातील कामगिरीही चांगली राहिली आहे. वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी असणे अत्यंत कठिण आहे. ती किमया विराट कोहलीने करून दाखवली आहे.

विराटच्या नेतृत्वात एकही आयसीआयसी ट्रॉफी नाही

रोहित शर्माने त्याच्या पूर्व कॅप्टनचे तोंड भरून कौतुक केले असले तरी विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकही आयसीआयसी ट्रॉफी जिंकली नाही. त्यामुळेच विराट कोहलीचं कर्णधारपद काढून घेण्यात आले आहे. आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकणार एकमेव कर्णधार रोहित शर्मा आहे. तसेच रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत प्रत्येक सिरीज जिंकली आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताला आगामी टी-20 विश्वचषक जिंकण्याचे वेध लागले आहे.

बेंचवर बसण्याच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

Alcohol sales increased| जिल्ह्यातील थंडीचा पारा वाढताच; मद्याच्या विक्रीतही वाढ

किल्ले रायगडावर अस्थी विसर्जनाचा घाट? मराठा सेवक समितीनं काय केलाय आरोप?