AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs CSK : राजस्थानने टॉस जिंकला, चेन्नईची बॅटिंग, संजू सॅमसन ‘ओपनिंग’साठी सज्ज

Rajasthan Royals vs Chennai Super Kings Toss : चेन्नई सुपर किंग्सची गेल्या मोसमात सुमार कामगिरी राहिली होती. त्यामुळे यंदा सीएसकेचा 19 व्या हंगामात विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे.

RR vs CSK : राजस्थानने टॉस जिंकला, चेन्नईची बॅटिंग, संजू सॅमसन 'ओपनिंग'साठी सज्ज
Riyan Parag and Ruturaj Gaikwad RR vs CSK Ipl 2026Image Credit source: IPL X Account
| Updated on: Mar 30, 2026 | 8:01 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील (IPL 2026) तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील पहिला सामना आहे. उभयसंघातील हा सामना राजस्थानच्या होम ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना गुवाहाटातील बारसपारा क्रिकेट स्टेडियमध्ये होणार आहे. सामन्यातील पहिला बॉल संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टाकण्यात येणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रियान पराग याने फिल्डिंगचा निर्णय घेत चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

संजू सॅमसनचं पदार्पण

संजू सॅमसन याने या सामन्यातून चेन्नई सुपर किंग्सकडून पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे संजूने त्याच्या माजी संघाविरुद्ध पदार्पण चेन्नईसाठी पदार्पण केलंय. संजू कॅप्टन ऋतुराज गायकवाड याच्यासह ओपनिंग करणार आहे. तसेच संजू महेंद्रसिंह धोनी याच्या अनुपस्थितीत सीएसकेसाठी विकेटकीपर म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. संजूने नुकत्यात झालेल्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली होती. संजूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात प्रमुख योगदान दिलं होतं. संजूला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर संजू आयपीएलमध्ये कशी कामगिरी सुरुवात करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघ तुल्यबळ, कुणी किती सामने जिंकलेत?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील हा एकूण 32 वा सामना आहे. आतापर्यंत उभयसंघात एकूण 31 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. सीएसकेने या 31 पैकी 16 सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्सने 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आता राजस्थान या मोसमात विजयी सुरुवात करत चेन्नई विरुद्ध 16-16 अशी बरोबरी करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजस्थान टॉसचा बॉस

चेन्नई सुपर किंग्स  प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, मॅथ्यू शॉर्ट, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मॅट हेन्री, अंशुल कंबोज आणि खलील अहमद.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई आणि ब्रिजेश शर्मा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...