AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने खरेदी केली 70 कोटींची जमीन, या हिल स्टेशनवर बांधणार ड्रीम होम!

Sachin Tendulkar Buys Land: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने श्रीच्या आगमनापूर्वी या हिल स्टेशनवर 70 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. त्यांनी 3.86 एकर जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी तो दुसरं घर बांधणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने खरेदी केली 70 कोटींची जमीन, या हिल स्टेशनवर बांधणार ड्रीम होम!
सचिन तेंडुलकर सेकंड होमImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 08, 2026 | 7:27 AM
Share

क्रिकेटचा देवा सचिन तेंडुलकर याने 3.86 एकर जमीन खरेदी केली आहे. या जमिनीची किंमत 70 कोटी रुपये इतकी आहे. थंड हवेच्या ठिकाणी एक आलिशान घर बांधण्याच्या उद्देशाने त्याने जमीन विकत घेतली आहे. राज्यातील या प्रसिद्ध हिल स्टेशनवर त्याचे हे सेकंड ड्रीम होमचं स्वप्न साकारणार आहे. या 4 सप्टेंबर 2026 रोजी जमिनीची खरेदी झाल्याचे Zapkey च्या वृत्तात म्हटले आहे. मास्टर ब्लास्टरने या ठिकाणी तीन जमिनीचे तुकडे खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

या हिल स्टेशनवर जमिनीची खरेदी

तीन वेगवेगळ्या खरेदीपत्रानुसार, सचिन तेंडुलकर याने जवळपास 3.86 एकर जमीन खरेदी केली. त्यापोटी त्याला 70 कोटी रुपये मोजावे लागले आहे. पुण्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा येथे त्याने 15,601.78 चौरस मीटर जागा खरेदी केली आहे. यातील सर्वात मोठ्या जमिनीच्या तुकड्यासाठी म्हणजे 3.09 एकरसाठी त्याने 63.69 कोटी रुपये मोजले आहेत. तर दुसरा जमिनीचा व्यवहार 4.56 कोटींमध्ये तर तिसरा जमिनीचा तुकडा 1.75 कोटी रुपयांत खरेदी केला आहे. 3.09 एकर जमिनी ही त्याच्या पूर्णता मालिकीची आहे. तर इतर दोन जमिनीत त्याची 50 टक्के सहभागीदारी असल्याचे समोर आले आहे.

इतके मोजले मुद्रांक शुल्क

या तीनही जमिनी त्याने नंदन मेहता आणि विवस्वत मेहता यांच्याकडून खरेदी केली आहे. या जमिनीच्या व्यवहारापोटी त्यांनी 4.20 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी जमा केली. तर नोंदणी शुल्कासाठी 90 हजार रुपये मोजले आहेत. Zapkey नुसार, प्रत्येक चौरस मीटर 4,168 चौरस फुट दरानुसार ही जमीन खरेदी करण्यात आली आहे. या व्यवहारावर सचिन तेंडुलकर आणि मूळ जमीन मालक यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

लोणावळा हे पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. ते राज्यातीलच नाही तर देशातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. आठवड्याच्या अखेरीस या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी होते. मान्सून आणि हिवाळ्यात येथे गर्दी असते. तसे 12 ही महिने येथे पर्यटकांचा राबता असतो. या ठिकाणची गुंतवणूक ही कमाईचे साधन मानले जाते. बॉलिवूड, क्रिकेट जगतापासून अनेक सेलिब्रिटींचे इथे बंगले आहेत. यातील काही भाग पर्यटकांना राहण्यासाठी देण्यात येतो. त्यातून या बंगल्याची देखभाल करण्यात येते. या ठिकाणी दुसरे घर बांधणाऱ्यांमध्ये अनेक परदेशी भारतीय सुद्धा आहेत. तर मोठे व्यापारी, व्यावसायिकांची सुद्धा इथं आलिशान बंगले आहेत.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात