Sara tendulkar : सचिनची मुलगी सारा तेंडुलकरच्या स्पेशल डेटची सोशल मीडियावर चर्चा

सारा एका क्रिकेटरला डेट करत असल्याच्या चर्चा समोर आल्या मात्र त्यात किती तथ्य हे अजून स्पष्ट नाही, मात्र साराची यावेळची डेट जरा हटके आहे आणि त्या डेटची सर्वत्र चर्चा आहे.

Sara tendulkar : सचिनची मुलगी सारा तेंडुलकरच्या स्पेशल डेटची सोशल मीडियावर चर्चा
सारा कायमच तिचे विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ती शिक्षणासाठी लंडनमध्ये असल्याने अनेकदा तिचे फोटो हे मुंबई आणि लंडन या ठिकाणचेच असतात. तिने तिच्या इन्स्टा कॅप्शनमध्ये मुंबई आणि लंडन अशा दोन्ही शहराचं नाव लिहिलं आहे.

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते, आता ती तिच्या एका पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. तिने एक स्पेशल डेटची पोस्ट केली आहे. त्यामुळे सारा तेंडुलकर कुणासोबत डेटवर गेली आहे. हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उतावळे झाले आहेत. याआधीही सारा एका क्रिकेटरला डेट करत असल्याच्या चर्चा समोर आल्या मात्र त्यात किती तथ्य हे अजून स्पष्ट नाही, मात्र साराची यावेळची डेट जरा हटके आहे आणि त्या डेटची सर्वत्र चर्चा आहे.

सारा तेंडुलकर कुणासाबोत डेटवर?

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तीच्या इन्टाग्राम पोस्ट नेहमी व्हायरल होत असतात. आता तिने अशीच एक इन्टाग्राम पोस्ट केली आहे, त्यात तिने कनिका कपूरसोबत स्पेशल डेटवर असल्याचं म्हटलं आहे, तर दुसरीकडे गायिका कनिका कपूरनेही असाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे या अनोख्या डेटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

याआधीही साराच्या डेटच्या चर्चा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोट्यवधी लोकांच्य मनावर राज्य करतो. त्याच्या एवढा दिग्गज खेळाडू भारतात क्वचितच पहायला मिळेल. त्यामुळे त्याचे आणि त्याच्या परिवाराचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे तेंडुलकर परिवार नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. कधी सचिन अचानक रस्त्यावर उतरून मुलांशी क्रिकेट खेळताना दिसून येतो, त्याचेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकरही नेहमीच चर्चेत असतात. सारा याआधीही एका क्रिकेटरला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

PPF: गुंतवणूक करायचीय? मग पीपीएफ ठरेल उत्तम पर्याय, मिळतील ‘हे’ 5 मोठे फायदे

रिचार्ज महागल्याचं टेन्शन सोडा, Jio च्या प्रीपेड प्लॅन्सवर तगडा कॅशबॅक, जाणून घ्या डिटेल्स

Nagpur दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी निधी, मोटराइज्ड ट्रायसिकलचंही वाटप, आणखी बरच काही

Published On - 6:10 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI