रिचार्ज महागल्याचं टेन्शन सोडा, Jio च्या प्रीपेड प्लॅन्सवर तगडा कॅशबॅक, जाणून घ्या डिटेल्स

टेलिकॉम दिग्गज कंपनी Jio चे नवीन प्रीपेड प्लॅन्स या आठवड्याच्या सुरुवातीला लाइव्ह झाले आहे. दूरसंचार कंपनीने सादर केलेले 20 टक्के कॅशबॅक प्लॅन्सदेखील सुधारित केले आहेत.

रिचार्ज महागल्याचं टेन्शन सोडा, Jio च्या प्रीपेड प्लॅन्सवर तगडा कॅशबॅक, जाणून घ्या डिटेल्स
प्रातनिधिक फोटो

मुंबई : टेलिकॉम दिग्गज कंपनी Jio चे नवीन प्रीपेड प्लॅन्स या आठवड्याच्या सुरुवातीला लाइव्ह झाले आहे. दूरसंचार कंपनीने सादर केलेले 20 टक्के कॅशबॅक प्लॅन्सदेखील सुधारित केले आहेत. यापूर्वी या प्लॅन्सची ​​किंमत 249 रुपये, 555 रुपये आणि 599 रुपये होती. जे Jio युजर्स या ऑफरची निवड करतील ते 200 रुपयांपर्यंत कॅशबॅकसाठी पात्र आहेत. जिओने म्हटले आहे की, रिचार्ज केल्यानंतर तीन दिवसांच्या आत कॅशबॅक युजर्सच्या खात्यात जमा होईल. (Reliance Jio giving 20 percent cashback on their prepaid plan starting from 299 rupees)

युजर्स रिलायन्स रिटेल चॅनेल आणि जिओ रिचार्ज, JioMart, Reliance Smart, Ajio, Reliance Trends, Reliance Digital आणि Netmeds सह इतर स्टोअरद्वारे कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. Jio ची 20 टक्के कॅशबॅक ऑफर आता 299 रुपये, रुपये 666 आणि रुपये 719 रुपयांच्या सुधारित प्लॅन्सवर लागू होईल. 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS उपलब्ध असतील. या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचा अॅक्सेस देखील उपलब्ध आहे. 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल्स, दररोज 100 SMS आणि Jio अॅप्सचा अॅक्सेस मिळतो.

144 रुपयांपर्यंत कॅशबॅक

719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे आणि त्यात Jio अॅप्सचा अॅक्सेस मिळतो. युजर्स या प्लॅनसह 144 रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकसाठी पात्र असतील.

1199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

719 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन व्यतिरिक्त, Jio 84 दिवसांच्या वैधतेसह 1199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. या प्लॅनच्या ग्राहकांनादेखील Jio अॅप्समध्ये अॅक्सेस मिळतो.

329 आणि 555 रुपयांच्या प्लॅन्सची किंमत वाढली

Jio चे 329 रुपये आणि 555 रुपयांचे प्लॅन अनुक्रमे 395 रुपये आणि 666 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. दोन्ही प्लॅन्स अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 SMS ऑफर करतात. तसेच यामध्ये अनुक्रमे 6GB डेटा आणि 1.5GB डेली डेटा स्वतंत्रपणे ऑफर केला आहे.

Jio चे 3GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन बंद

दरम्यान, Jio ने 3GB डेली डेटा प्रीपेड प्लॅनदेखील बंद केले आहेत ज्यांची किंमत 499 रुपये, 666 रुपये आणि 888 रुपये इतकी आहे आणि यात Disney+ Hotstar मेंबरशिप उपलब्ध आहे. सुधारित 3GB डेली डेटा प्लॅन वाढीव टॅरीफ यादीचा भाग नव्हते, जे दूरसंचार ऑपरेटर कंपनीने घोषणेवेळी जारी केले होते.

इतर बातम्या

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Iphone 12 vs Iphone 13 : फक्त किंमत आणि कॅमेराच नव्हे तर आणखी बरेच फरक, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट मॉडेल कोणतं?


(Reliance Jio giving 20 percent cashback on their prepaid plan starting from 299 rupees)

Published On - 6:06 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI