AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हा माझ्या लक्षात आले की..! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकरने मोजक्याच शब्दात सांगितलं

टीम इंडियाचा माजी कसोटी कर्णधार आणि फलंदाज अजिंक्य रहाणे याने निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या निवृत्तीनंतर क्रीडाविश्वातून प्रतिक्रिया उमटत आहे. असं असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली आहे.

तेव्हा माझ्या लक्षात आले की..! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकरने मोजक्याच शब्दात सांगितलं
तेव्हा माझ्या लक्षात आले की..! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकरने मोजक्याच शब्दात सांगितलंImage Credit source: BCCI/PTI/TV9Network
| Updated on: Jul 30, 2026 | 7:53 PM
Share

भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने 30 जुलैला क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. पण त्याला काही स्थान मिळालं नाही. अखेर त्याने भविष्याचा विचार करता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी सामने खेळले आणि 6 सामन्यात संघाचं नेतृत्व केलं. अजिंक्य रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला संघात स्थान मिळालं होतं. मुंबईकडून खेळताना अजिंक्य रहाणेने आपली छाप टाकली आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं होतं. इतकी वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर अजिंक्य रहाणेने वयाच्या 38व्या वर्षी क्रिकेट थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निवृत्तीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एक ट्वीट करून प्रतिक्रिया नोंदवली आहे. यावेळी सचिनने मुंबईसाठी एकत्र खेळलेल्या आठवणींना उजाळा दिला.

अजिंक्यबद्दल काय म्हणाला सचिन तेंडुलकर?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अजिंक्य रहाणेचं कौतुक करत ट्वीट केलं की, ‘तुमच्या उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल अभिनंदन. अजिंक्य जेव्हा आपण मुंबईसाठी पहिल्यांदा एकत्र फलंदाजी केली, तेव्हा मी तुझ्यात एक अशी व्यक्ती पाहिली जी कधीही संधीच्या मागे धावत नाही. संधी तुमच्याकडे चालून यायची, कारण तू संघासाठी कठोर परिश्रम करण्यास तयार होता. तोच गुण ऑस्ट्रेलियातील तुमच्या सर्वोत्तम क्षणाचे वैशिष्ट्य होता. तू दाखवून दिले की संयम हा आक्रमकतेच्या विरुद्ध नसतो. अनेकदा तोच संघाला निर्भय होण्याचा आत्मविश्वास देतो. तुझ्या शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदन! तुला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा.’

अजिंक्य रहाणेची क्रिकेट कारकिर्द

अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीत 85 कसोटी, 90 वनडे आणि 20 टी20 सामने खेळला आहे. कसोटी 144 डावात फलंदाजी केली असून 38.46 च्या सरासरीने 5077 धावा केल्या आहेत. यात 12 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. तर वनडेत 87 डावात फलंदाजी केली आणि 2962 धावा केल्या. यात तीन शतकं आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 डावात फलंदाजी केली. यात 20.83 च्या सरासरीने आणि 113.29 च्या स्ट्राईक रेटने 375 धावा केल्या. यात फक्त एकच अर्धशतक ठोकलं.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल