AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: कृणाल पांड्याने अंतिम फेरीत टाकलेल्या त्या चेंडूचं सचिन तेंडुलकरने केलं कौतुक, म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीचा अष्टपैलू कृणाल पांड्याने जबरदस्त स्पेल टाकला. त्याने 4 षटकात 23 धावा दिल्या आणि एक विकेट काढली. जोस बटलरची काढलेली विकेट पाहून सचिन तेंडुलकरने त्याच्या गोलंदाजीचं कौतुक केलं.

IPL 2026: कृणाल पांड्याने अंतिम फेरीत टाकलेल्या त्या चेंडूचं सचिन तेंडुलकरने केलं कौतुक, म्हणाला...
IPL 2026: कृणाल पांड्याने अंतिम फेरीत टाकलेल्या त्या चेंडूचं सचिन तेंडुलकरने केलं कौतुक, म्हणाला...Image Credit source: PTI
| Updated on: May 31, 2026 | 10:44 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मजबूत पकड राहिली. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीला बाद केलं. त्यामुळे हा सामना पावरप्लेपासूनच आरसीबीच्या पारड्यात झुकलेला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा या जोस बटलरच्या फलंदाजीकडे झुकलेल्या होत्या. कारण बटलर कायम मोठ्या सामन्यात घातक ठरलेला आहे. पण अष्टपैलू कृणाल पांड्याने त्याच्या पुढ्यात एक जादुई चेंडू टाकला. त्या चेंडूचा सामना करताना जोस बटलर फसला. त्याने टाकलेल्या चेंडूचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचं कौतुक केलं. कृणाल पांड्याने या सामन्यात त्याने फलंदाजांना फटकेबाजी करण्यापासून रोखलं.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने संघाचं 13वं षटक कृणाल पांड्याच्या हाती सोपवलं. जोस बटलर क्रीजवर सेट झाला होता. त्याने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी पुढे आला. कृणाल पांड्याने त्याची रणनिती आधीच हेरली आणि त्याच्यापासून चेंडू लांब ठेवला. वेगाने यॉर्कर लेंथ यॉर्कर टाकला. त्यामुळे जोस बटलरने शेवटच्या क्षणी चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थेट विकेटकीपर जितेश शर्माच्या हातात गेला. त्याने जराही चूक न करता त्याला यष्टीचीत केलं.

सचिन तेंडुलकरने केलं कौतुक

कृणाल पांड्याची समयसूचकता पाहून सचिन तेंडुलकरनेही त्याचं कौतुक केलं. त्याने सोशल मीडियावर कृणाल पांड्याच्या चेंडूची स्तुती करणारी पोस्ट केली. यात सचिन तेंडुलकरने लिहिलं की, ‘कृणाल पांड्याचा काय अप्रतिम चेंडू होता! चेंडू सोडण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याने फलंदाजाच्या पायांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आणि मग एक अचूक चेंडू टाकून त्याला ड्रेसिंग रूममध्ये परत पाठवले.’

गुजरात टायटन्सने या सामन्यात 20 षटकात 8 गडी गमवून 155 धावा केल्या. तसेच विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान आरसीबीसाठी खूपच सोपं आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच