Road Safety World Series च्या आयोजकांनी सचिन तेंडुलकरचे पैसे खाल्ले, मास्टर ब्लास्टरने घेतला मोठा निर्णय

| Updated on: Jan 20, 2022 | 7:39 PM

सचिन तेंडुलकर इंडिया लिजिंडससाठी (India legend) खेळला होता. या संघाने जेतेपद पटकावलं होतं.

Road Safety World Series च्या आयोजकांनी सचिन तेंडुलकरचे पैसे खाल्ले, मास्टर ब्लास्टरने घेतला मोठा निर्णय
सचिन तेंडुलकर
Follow us on

मुंबई: महान क्रिकेटपटू आणि भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या (RSWS) दुसऱ्या आवृत्तीचा भाग नसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू या सीरीजमध्ये खेळतात. या सीरीजचा भाग असणाऱ्यांना अजून पहिल्या सीजनचेच पैसे मिळालेले नाहीत. सचिन तेंडुलकर इंडिया लिजिंडससाठी (India legend) खेळला होता. या संघाने जेतेपद पटकावलं होतं. सचिनला अजून पहिल्या सीजनचेचे पूर्ण पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सचिनने या सीरीजमधून माघार घेतली आहे.

सुनील गावस्कर स्पर्धेचे कमिशनर होते

खालेद महमुद, खालेद मसहुद, मेहराब होसैन, नफीस इक्बाल यासह आणखी काही बांगलादेशी खेळाडूंना अजून पैसे मिळालेले नाहीत. बांगलादेशी मीडियामध्ये यासंबंधी बातमी आली होती. स्पर्धेच्या पहिल्या एडिशनचा सचिन तेंडुलकर ‘ब्रँड अम्बेसेडर’ होता. सुनील गावस्कर स्पर्धेचे कमिशनर होते.

“सचिन RSWS च्या या सीजनमध्ये खेळणार नाहीय. 1 ते 19 मार्च दरम्यान यूएईमध्ये ही स्पर्धा होणार आहे. पण सचिन कुठल्याही प्रकारे या स्पर्धेशी संबंधित नसेल” असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले. अन्य क्रिकेटपटुंप्रमाणे सचिनलाही आयोजकांनी पहिल्या सीजनचे पैसे दिलेले नाहीत. 2020 मध्ये स्पर्धा झाली, त्यावेळी प्रत्येक खेळाडूला 10 टक्के देण्याचे ठरले होते. 25 फेब्रुवारी 2021 पर्यंत 40 टक्के देण्यात येणार होते. 31 मार्च 2021 पर्यंत उर्वरित 50 टक्के द्यायचं ठरलं होतं.

Sachin Tendulkar to not be part of Road Safety World Series dues of several players allegedly pending