AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन तेंडुलकर या भन्नाट वेबसिरीच्या प्रेमात, वायुसेनेला थेट पत्र लिहिलं, म्हणाला…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नुकतीच नेटफ्लिक्सवर ऑपरेशन सफेद सागर वेब सीरिज पाहिली. या भारतीय वायुसेनेचं शौर्य पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर ओपन पत्र लिहून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सचिन तेंडुलकर या भन्नाट वेबसिरीच्या प्रेमात, वायुसेनेला थेट पत्र लिहिलं, म्हणाला...
सचिन तेंडुलकर या भन्नाट वेबसिरीच्या प्रेमात, वायुसेनेला थेट पत्र लिहिलं, म्हणाला...Image Credit source: Sachin Tendulkar X
| Updated on: Sep 02, 2026 | 8:53 PM
Share

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आहे. त्याने या पोस्टमध्ये ऑपरेशन सफेद सागर वेब सीरिजचा उल्लेख केला आहे. त्यामुळे ज्यांनी ही वेब सीरिज पाहिली नाही त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नेटफ्लिक्सवरील ‘ऑपरेशन सफेद सागर’ ही सीरिज पाहिल्यानंतर वायुसेनेच्या जवानांसाठी एक खुले पत्र लिहिलं आहे. त्यात सचिनने त्यांच्या शौर्याचे व त्यागाचे कौतुक केले आहे. सचिन तेंडुलकरने मीडियावर एअर चीफ मार्शल बी एस धनोआ यांच्यासोबत एक जुना फोटो पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 1999 मधील कारगिल युद्धावर आधारित या वेब सीरिजने सचिनच्या मनाला स्पर्श केला असून त्याने भारतीय हवाई दलाच्या धैर्याला कडक सॅल्यूट ठोकला आहे. जिमी शेरगिल याने बीएस धानोआ यांची भूमिका या वेब सीरिजमध्ये साकारली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सांगितलं की, ‘प्रिय भारतीय वायुसेना, नुकतीच ऑपरेशन सफेद सागर ही वेब सीरिज पाहिली. ही सीरिज पाहिल्यानंतर मला जाणीव झाली की, सीमेवर प्रचंड मानसिक दबाव आणि अनिश्चितता सहन करणाऱ्या जवानांचे आयुष्य आपल्यापेक्षा किती वेगळे असते. शत्रूचा सामना करत डोळ्यात तेल घालून पहारा देतात, म्हणूनच आपल्यासारखे नागरिक देशात शांतपणे झोपू शकतात आणि आपले दैनंदिन जीवन जगू शकतात. मी काही वर्षांपूर्वी एअर चीफ मार्शल बी एस धनोआ यांना भेटलो होतो. कारगिल युद्धादरम्यान त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या कठीण परिस्थितीचा सामना केला, ते या सीरिजमध्ये पाहिल्यानंतर माझ्या मनात त्या जुन्या भेटीबद्दलचा आदर आणि कृतज्ञता अधिक वाढली आहे. ‘ 2010 मध्ये वायुसेनेने सचिन तेंडुलकरला ग्रुप कॅप्टन या मानद पदाने सन्मानित केलं होतं.

सचिन तेंडुलकरने पुढे सांगितलं की, ‘हे धाडस विलक्षण आहे. त्यामागील शिस्त आणि मानसिक सामर्थ्यही आश्चर्यकारक आहे. भारतीय हवाई दलात सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि त्याची मूल्ये मला समजतात. ही कहाणी पाहून माझी कृतज्ञता अधिकच वाढली आहे. तुम्ही आमच्यासाठी जे काही करता त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद! ‘

कारगिल युद्धात बी एस धनोआ विंग कमांडर होते आणि त्यांनी नंबर 17 स्काड्रन गोल्डन एरोजची कमान सांभाळली होती. मिग-21 लढाऊ विमानांनी सुसज्ज असलेल्या या स्क्वाड्रनने ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये सहभाग घेतला होता.

Follow Us
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत... खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!