
इंग्लंड क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. इग्लंड टीम इंडियाविरुद्ध टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात 5 पैकी 2 सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तर तिसरा सामना हा 28 जानेवारीला राजकोटमध्ये होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याने तसं का केलं? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. संजूने तिसऱ्या सामन्याआधी नक्की काय केलंय? हे जाणून घेऊयात.
संजूला या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात काही खास करता आलेलं नाही. संजूला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड या दोघांसमोर संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे संजूने तिसऱ्या सामन्याआधी स्पेशल सराव केल्याचं समोर आलं आहे. संजूने राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिममध्ये सिमेंटच्या खेळपट्टीवर 45 मिनिटं प्लास्टिक बॉलने सराव केला. संजूने नवे बॅटिंग कोच सितांशू कोटक यांच्यासह प्लास्टिक बॉलसह सराव केला. संजूने हुक शॉटचा सराव केला. तसेच कट शॉट आणि रॅम्प शॉटचाही सराव केला.
जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड हे दोघेही वेगाने बॉलिंग करतात, त्यामुळे अधिकची उसळी मिळते. त्यासाठीच संजूने प्लास्टिक बॉलने सिमेंटच्या खेळपट्टीवर सराव केला.
दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या टी 20I मालिकेनंतर संजू थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. संजूची इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे संजू थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
दरम्यान संजूला या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये काही खास करता आलं नाही. संजूने पहिल्या सामन्यात 26 तर दुसऱ्या सामन्यात 5 धावा केल्या आहेत. संजूला दोन्ही सामन्यांमध्येच जोफ्रा आर्चर यानेच आऊट केलं. त्यामुळे आता संजू प्लास्टिक बॉलने सराव केल्यानंतर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाची कसा सामना करतो? याकडे साऱ्यांच लक्ष असणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी सुधारित भारतीय क्रिकेट संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे आणि रमणदीप सिंग.