AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy: सर्फराजच्या खानच्या 275 धावा, मुंबईचा सौराष्ट्राविरुद्ध धावांचा डोंगर

सौराष्ट्राविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या डावात मुंबईने धावांचा (Mumbai vs Saurashtra) डोंगर उभा केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरु आहे.

Ranji Trophy: सर्फराजच्या खानच्या 275 धावा, मुंबईचा सौराष्ट्राविरुद्ध धावांचा डोंगर
| Updated on: Feb 18, 2022 | 5:43 PM
Share

अहमदाबाद: सौराष्ट्राविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या डावात मुंबईने धावांचा (Mumbai vs Saurashtra) डोंगर उभा केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना सुरु आहे. मुंबईने सातबाद 544 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. मधल्याफळीतील फलंदाज सर्फराज खान (275) आणि अजिंक्य रहाणेच्या (129) धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने सौराष्ट्राविरुद्ध धावांचा हा डोंगर उभारला. सर्फराज आणि अजिंक्यने चौथ्या विकेटसाठी 252 धावांची भागीदारी केली. दोघांनी कालच आपली शतक पूर्ण केली होती. आज सर्फाराने द्विशतक झळकावलं. सर्फराजचं (Sarfaraz Khan) मागच्या नऊ डावातील हे दुसर द्विशतक आहे. त्याने एक त्रिशतक सुद्धा झळकावलं आहे. महत्त्वाचं म्हणजे संघ अडचणीत सापडलेला असताना सर्फराज खानने फलंदाजीत चमक दाखवली. मुंबईच्या अवघ्या 44 धावांवर तीन विकेट गेल्या होत्या. कॅप्टन पृथ्वी शॉ एक रन्सवर आऊट झाला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि सर्फराज खानने मुंबईच्या डावाला आकार दिला.

मुंबईकडून तनुष कोटियननेही नाबाद 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. अजिंक्य रहाणेकडून आजही अपेक्षा होत्या. पण 129 धावांवर तो जानीच्या गोलंदाजीवर पटेलकरवी झेलबाद झाला. त्याने शतकी खेळीत 17 चौकार आणि दोन षटकार लगावले. सर्फराजने 401 चेंडूत 275 धावा करताना 30 चौकार आणि सात षटकार लगावले. सर्फराजला मंकडने पायचीत पकडलं. दिवसअखेर सौराष्ट्राच्या बिनबाद 18 धावा झाल्या आहेत. हार्विक देसाई आणि स्नेल पटेलची जोडी मैदानावर आहे.

सर्फराजला मोठी खेळी खेळण्याची सवय

सर्फराज खानला मोठी खेळी करण्याची सवय लागली आहे. मागच्या रणजी सीजनमध्ये त्याने 391 चेंडूत 301 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने 213 चेंडूंचा सामना करताना नाबाद 226 धावा केल्या. सर्फराजने 177 धावांची खेळी सुद्धा केली आहे. इतकी दमदार फलंदाजी करुनही आयपीएल ऑक्शन 2022 मध्ये त्याच्यावर मोठी बोली लागली नाही. त्याला अवघ्या 20 लाख रुपयाच्या बेस प्राइसवर दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतलं आहे. असंच प्रदर्शन कायम राहिल्यास सर्फराज खान आपल्याला लवकरच भारतीय संघात दिसू शकतो.

sarfaraz khan from mumbai smashed double century vs saurashtra in ranji trophy

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली