
रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेची मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. प्रत्येक संघातील भविष्यातील स्वप्न उराशी बाळगून देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहेत. या स्पर्धेत नशिब चमकलं तर टीम इंडियाचं दार भविष्यात उघडेल असा विश्वास खेळाडूंना आहे. मुंबई संघातून खेळणाऱ्या बऱ्याच खेळाडूंना हा विश्वास आहे. त्यामुळे नाव कमवण्यासाठी चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्न करत आहे. नावात काय आहे असं म्हणतात. पण नाव झालं की पुढचा विचार होतो. त्यामुळे नावासाठीच धडपड सुरु असते. पण मुंबई आणि जम्मू काश्मीर सामन्यात नावाबाबत अशी चूक पाहायला मिळाल. मुंबईकडून सलामीला मुशीर खान आणि आयुष म्हात्रे आला होता. पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मुशीर खान बाद होत तंबूत परतला. मुंबईला हा मोठा धक्का होता. पण मुशीर खानच्या जागी स्कोअर बोर्डवर सरफराज खानचं नाव लिहिलं होतं. सरफराजच्या नावापुढे शून्य असं लिहिलं होतं. तेव्हा सरफराज खान खेळण्यासाठीही उतरला नव्हता.
बीसीसीआयच्या या चुकीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. खरं तर स्कोअर बोर्डवर मुशीर खान आणि आयुष म्हात्रेचं नाव असायला हवं होतं. पण मुशीर ऐवजी त्याचा मोठा भाऊ सरफराज खानचं नाव लिहिलं गेलं. सरफराज खानचं नाव ओपनिंगला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांना वाटलं की मुंबईने सरफराज पुढे करत मोठा प्रयोग केला असेल. पण नंतर चूक लक्षात येताच बीसीसीआयकडून दुरूस्ती करण्यात आली. स्कोअर बोर्डवर सरफराजच्या जागी मुशीर खानचं नाव लिहिण्यात आलं.
Iffy start for the BCCI scorers too. After having Sarfaraz Khan open the batting and fall for a duck for Mumbai vs J&K, the scorecard now has Musheer Khan. Perks of no streaming.#RanjiTrophy pic.twitter.com/ctXLzQ54hw
— Lalith Kalidas (@lal__kal) October 15, 2025
दुसरीकडे, सरफराज खानही खास करू शकला. मुंबईच्या 74 धावांवर 3 विकेट पडल्यानंतर सरफराज खान मैदानात उतरला. सिद्धेश लाडसोबत त्याने 67 धावांची भागीदारी केली. पण दुर्दैवाने 42 धावांवर असताना धावचीत झाला. त्यामुळे त्याचं अर्धशतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. त्यामुळे मुंबईची स्थिती नाजूक झाली. पण सिद्धेश लाडने 156 चेंडूत 17 चौकार आणि 3 षटकार मारत 116 धावा केल्या. तर शम्स मुलानीने नाबाद 79 धावा, तर आकाश आनंद नाबाद 15 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 5 गडी गमवून 336 धावा केल्या आहेत.