
भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळणं वाटतं तितकं सोपं नाही. अनेकांना तिथपर्यंत पोहोचून प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवणं देखील कठीण होतं.अशी अनेक उदाहरणं आहेत. आता भारतीय संघ आशिया कप स्पर्धेसाठी युएई दौऱ्यावर आहे. अभिमन्यू ईश्वरन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याने 2021-22 मध्ये पदार्पण केलं होतं. पण अजूनही प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. दुसरीकडे, आंध्रप्रदेशच्या एका आमदाराच्या जावई टीम इंडियाचा मॅनेजर म्हणून गेला आहे. त्यामुळे बराच वाद सुरु आहे. दरम्यान, दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेतही असाचा वाद रंगला होता. खासदाराच्या मुलाचं संघात निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या निवडीनंतर वशिलेबाजीचा आरोप केला होता. कारण बिहारच्या पुर्णिया येथील खासदार पप्पू यादव उर्फ राजेश रंजन यांच्या मुलगा सार्थक रंजन याची झालेली निवड… त्याला पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली इंटर स्टेट टी20 स्पर्धेसाठी निवडलं होतं. त्यामुळे निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.
निवड समितीने उन्मुक्त चंद आणि हितेन दलाल यासारख्या दिग्गज खेळाडूंना डावलून तेव्हा सार्थक रंजनला संधी दिली होती. सार्थक रंजनने नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्लीसाठी टी20 डेब्यू केलं होतं. त्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हैदराबादविरुद्ध दिल्लीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पण हा सामना ड्रॉ झाला आणि सार्थकही काही खास करू शकला नाही. पण हे सर्व अपयश पचवून खासदार पप्पू यादव यांच्या मुलाने दिल्ली प्रीमियर लीग 2025 मध्ये यशाची नवी पायरी चढली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इतकंच काय तर पाच भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत देखील सहभागी झाला आहे. या क्रिकेटपटूंनी 2025 स्पर्धेत शतक ठोकलं आहे.
सार्थक रंजनने दिल्ली प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत एकूण 9 सामन्यात 9 डाव खेळले. यात त्याने 56.12 च्या सरासरीने 146 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 449 धावा केल्या. यावेळी त्याने 21 षटकार आणि 44 चौकार मारले. तसेच एक शतक ठोकलं. सार्थक रंजन आता डीपीएलमध्ये शतक ठोकणारा पाचवा खेळाडू आहे. यापूर्वी यश ढूल, नितीश राणा, प्रियांश आर्या आणि आयुष डोसेजाने शतकी खेळी केली आहे. सार्थक रंजनने दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.