AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shikhar Dhawan: शेवटी बापच तो! घटस्फोटानंतर दोन वर्षांनी मुलाला भेटताच शिखर झाला भावूक

भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) जवळपास दोन वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आपल्या मुलाची भेट घेतली.

Shikhar Dhawan: शेवटी बापच तो! घटस्फोटानंतर दोन वर्षांनी मुलाला  भेटताच शिखर झाला भावूक
| Updated on: Feb 20, 2022 | 4:38 PM
Share

मेलबर्न: भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) जवळपास दोन वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आपल्या मुलाची भेट घेतली. धवनने मुलाला भेटल्याचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये धवनने मुलाला उचलून घेतलं व मिठी मारली. धवनचा मुलगा जोरावर 2020 पासूनच ऑस्ट्रेलियामध्ये आहे. कठोर कोविड नियमांमुळे (Covid Rules) शिखरला ऑस्ट्रेलियात जाऊन मुलाची भेट घेता आली नाही. धवनने शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “त्याच्यासोबत खेळणं, त्याला मिठी मारणं, त्याच्यासोबत बोलणं हे सर्व भावनिक क्षण आहेत. आयुष्यभर लक्षात राहतील असे हे क्षण आहेत” असं म्हटलं आहे. मागच्यावर्षी शिखर धवनच्या व्यक्तीगत आयुष्यात वादळ आलं होतं. सप्टेंबर महिन्यात शिखरची पत्नी आयशा मुखर्जीने (Ayesha Mukherjee) पती-पत्नीचं नातं संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. नऊ वर्षाचा शिखरचा संसार मोडला.

पत्नी शिखरपेक्षा वयाने मोठी

शिखर धवनने ऑक्टोबर 2012 मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर दोनवर्षांनी 2014 मध्ये जोरावरचा जन्म झाला. जोरावर आता आपल्या आईसोबत मेलबर्नमध्ये राहतो. शिखर धवनची पत्नी त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे.

शिखर धवन भारताचा भरवशाचा फलंदाज आहे. आगामी आयपीएल 2022 मध्ये तो पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. पंजाबने 8.25 कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं आहे. यंदाच्या सीजनमध्ये त्याची पंजाब किंग्सच्या कर्णधारपदीही निवड होऊ शकते. मेगा ऑक्शनआधी दिल्ली कॅपिटल्सने शिखर धवनला रिलीज केलं होतं. आयपीएलच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये शिखर धवनचा समावेश होतो. शिखर धवनने आतापर्यंत 192 आयपीएल सामन्यांमध्ये 5784 धावा केल्या आहेत.

shikhar dhawan meets son zoravar after two years shares emotional video

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.